नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , बाबा जुमदेवजींच्या जयंतीनिमित्त नव्याने बांधलेल्या मानव मंदिर आणि ध्यान केंद्राचे ५१ मार्गदर्शकांच्या हस्ते उद्घाटन – आजचा महाराष्ट्र

बाबा जुमदेवजींच्या जयंतीनिमित्त नव्याने बांधलेल्या मानव मंदिर आणि ध्यान केंद्राचे ५१ मार्गदर्शकांच्या हस्ते उद्घाटन

सचिन चौरसिया रामटेक तालुका प्रतिनिधी

नागपुर (रामटेक) :- दि .४.रामटेक परमात्मा एक सेवक संस्था मानव मंदिर दुधाळा यांच्या वतीने नवनिर्मित मानव मंदिर व ध्यान केंद्राचे उद्घाटन महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या जयंतीनिमित्त ५१ मार्गदर्शकांच्या हस्ते करण्यात आले. जयंतीनिमित्त ३ दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. १ एप्रिल रोजी सकाळी रामटेक शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. मोठ्या संख्येने सेवक सहभागी झाले होते. २ एप्रिल रोजी सकाळी हवन सोहळा झाला. दुपारी चार वाजल्यापासून गायिका पायल डोंगरे हिने बाबा जुमदेव यांच्या चरित्रावरील भजन सादर केले. ३ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता रामटेक बसस्थानक येथून भव्य रथयात्रा काढण्यात आली व मानव मंदिर दुधाळा येथे समापन झाले. रथयात्रेत अनेक रथ आणि हजारो लोक उपस्थित होते. दुपारी १ वाजता नवनिर्मित मानवी मंदिर व ध्यान केंद्राचे उद्घाटन ५१ मार्गदर्शकांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महेंद्र बुधे होते. यावेळी मार्गदर्शक दामोधर वंजारी, मार्गदर्शक गिरधर बर्गे, आमदार आशिष जयस्वाल, माजी मंत्री राजेंद्र मुळक, माजी आमदार डी.मलिकार्जुन रेड्डी, पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे, सामाजिक कार्यकर्ते विशाल बरबटे, एड. प्रफुल्ल अंबादे, पंचायत

समिती उपसभापती नरेंद्र बांधाटे, रुषीकेश किंमतकर, बाबा किमतकर, जिप सदस्य शांताबाई कुमरे सहित आदी उपस्थित होते.परमात्मा एक सेवक संस्थेचे अध्यक्ष रामदास मथुरे यांनी जनकल्याणासाठी दारूमुक्ती अभियान जोमाने राबविले जाणार असल्याचे सांगितले. मान्यवर उपस्थितांनी संस्थेमार्फत चालवले जाणारे व्यसन मुक्ति कार्य मानव कल्याणासाठी अत्यंत महत्वाचे असल्याचे सांगितले. यशासाठी कार्यक्रम यसस्वीते करिता रामटेक परमात्मा एक सेवक संस्थेचे मार्गदर्शक जयरामजी महाजन, अध्यक्ष रामदास मथुरे, सुनील देवगडे, हरिचंद्र नागपुरे, माणिक चौधरी, जिजाबाई काटोळे, नारायण कारेमोरे, नथू मानकर, छाया मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध समित्यांनी काम केले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]