नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , राष्ट्रीय आदर्श विद्यालय द्वारा मतदार जनजागृती रॅली – आजचा महाराष्ट्र

राष्ट्रीय आदर्श विद्यालय द्वारा मतदार जनजागृती रॅली

सचिन चौरसिया रामटेक तालुका प्रतिनिधी

नागपुर (रामटेक) :- मा.भारत निवडणूक आयोग यांचे द्वारा मतदारांचे पद्धतशीर शिक्षण आणि निवडणूक सहभाग या कार्यक्रमांतर्गत मतदानाचे प्रमाण वाढविणे व निवडणुकांमध्ये मतदारांचे महत्त्व यासंबंधात व्यापक स्वरूपात जनजागृती करणे या हेतूने राष्ट्रीय आदर्श विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालय नवेगाव खैरी यांचे द्वारा राष्ट्रीय आदर्श विद्यालय शिक्षण मंडळाचे सचिव मा.

मयंकराव देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली १ एप्रिलला नवेगाव खैरी गावात मतदार जनजागृती मिरवणूक काढण्यात आली. यावेळी इयत्ता ८ वी व ९ वीतील विद्यार्थ्यांचा सहभाग होता. याप्रसंगी शाळेचे शिक्षक साक्षोधन कडबे आणि अमित मेश्राम यांनी नागरिकांना मार्गदर्शन करतांना, “मतदान करणे ही प्रत्येक मतदाराची राष्ट्रीय जबाबदारी असल्याचे प्रतिपादन केले.” यावेळी शाळेतील शिक्षक नीलकंठ पचारे, दिलीप पवार, शैलेंद्र देशमुख, सतीश जुननकर, सौ. तारा दलाल, सौ. अर्चना येरखेडे, प्रा. अरविंद दुनेदार, प्रा. सुनील वरठी, प्रा. मोहना वाघ व समस्त शिक्षकेत्तर कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]