कोनगावच्या श्री गणेश घाटावर इफ्तार पार्टी!
प्रतिनिधी कल्याण
कल्याण (कोनगाव) :- समाजातील सामाजिक ऐक्य, सलोखा आणि बंधुभाव वृद्धिंगत करण्यासाठी ड्रीम कॉम्प्लेक्स कोनगावच्या वतीने भव्य इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भारतीय जनता पार्टी कल्याण शहर अध्यक्ष वरुण पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले, मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू असून मुस्लिम बांधव रमजान महिन्यात उपवास करतात. या महिन्यात मुस्लिम समाज 
बांधव इतर समाजातील लोकांना इफ्तार पार्टीसाठी निमंत्रण देत असतात. यामुळे हिंदू मुस्लिम ऐक्य भावना वाढते.गेल्या अनेक वर्षांहून अधिक काळ पार पडत असलेल्या या उपक्रमामध्ये धर्माच्या बंधना पलीकडे जाऊन सामाजिक एकोपा जपणाऱ्या या सर्व समाज बांधवांचे जाहीर आभार भारतीय जनता पार्टी कोन शहर अध्यक्ष हनुमान म्हात्रे यांनी व्यक्त केले कोनगावचे उपसरपंच विनोद म्हात्रे यांनी रोजे ठेवणाऱ्या सर्व मुस्लिम बांधवांना या पवित्र रमजान महिन्याच्या शुभेच्छा दिल्या, याप्रसंगी बोलताना ते म्हणाले या पवित्र महिन्यामध्ये सर्वांनाच सुख-समृद्धी प्राप्त व्हावी तसेच समाजात शांतता प्रस्थापित करण्याकरिता तसेच देशातील सर्व धर्मीयांमध्ये सौदाह्य प्राप्त होण्याकरता आपण सर्वांनीच एकत्र येऊन या पुढील काळात निश्चित प्रयत्न करायला हवेत, रोजा ठेवणाऱ्या सर्व बांधवांना आत्मिक बळ प्राप्त व्हावे हीच आपण प्रार्थना करूयात.सदर प्रसंगी कपिल पाटील फाऊंडेशनचे सदस्य फराज खांडे, भाजपा अल्पसंख्यांक भिवंडी तालुका अध्यक्ष शादाब गांगरेकर, माजिद कुरेशी, इम्रान शेख, शिवसेना अल्पसंख्यांक ठाणे जिल्हा अध्यक्ष सोहेल गांगरेकर, कोन ग्रामपंचायत सदस्य महेंद्र भगत, गोवे ग्रामपंचायत सदस्य संजय कराळे, जाणीव सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा अश्विनी मेस्त्री, जमाते इस्लामी हिंद कोन यूनिटचे अध्यक्ष इंतेखाब आलम, वरिष्ठ पत्रकार शाहजहान मगदुम, सिद्धार्थ कांबळे, अहमद पटेल, गुलाम भाई, जमाल शेख, तोराब भाई, इरफान भाई, वसिम भाई व मुस्लिम समाजातील नागरिकांची अत्यंत मोठ्या प्रमाणावर उपस्थित होती. भिवंडीतील सामाजिक कार्यकर्ते शाहिद मेंढा आपल्या शेकडो मित्रासह मित्र परिवाराच्या वतीने आयोजित इफ्तार पार्टीमध्ये सहभागी होऊन मुस्लिम बांधवांना पवित्र रमजान च्या शुभेच्छा दिल्या.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













