नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , राष्ट्रीय कर्तव्य म्हणून जबाबदारीने प्रशिक्षण घ्या  – जिल्हाधिकारी अभिजित राऊत – आजचा महाराष्ट्र

राष्ट्रीय कर्तव्य म्हणून जबाबदारीने प्रशिक्षण घ्या  – जिल्हाधिकारी अभिजित राऊत

नांदेड :- दि.२९.प्रत्येक मतदान अधिकारी व कर्मचारी यांनी ‘चुनाव का पर्व, देश का गर्व ‘या भावनेने राष्ट्रीय कर्तव्य म्हणून जबाबदारीने प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष मतदान केंद्रावरील येऊ घातलेल्या समस्या कोणत्या असू शकतात, याचाही प्रशिक्षण घेताना विचार करून आलेल्या समस्यांचे निराकरण प्रशिक्षणाच्या माध्यमातून पूर्ण केल्यास मतदान घेणे अधिक सोयीचे व सोपे होते,

असे प्रतिपादन निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले.नांदेड लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या 087 नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या प्रथम प्रशिक्षणात केले आहे.प्रशिक्षणाच्या सुरुवातीस अभिजित राऊत यांचे विकास माने, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नांदेड यांनी स्वागत केले व प्रशिक्षणाचे प्रास्ताविक नितेशकुमार बोलोलू, प्रशिक्षण प्रमूख तथा नायब तहसिलदार निवडणूक तहसिल कार्यालय नांदेड यांनी केले. यावेळी प्रशिक्षण मंचावर ललितकुमार व-हाडे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी 86 नांदेड उत्तर विधानसभा संघ तथा उपजिल्हाधिकारी रोहयो, तहसिलदार उमाजी बोथीकर, मनपा शिक्षणाधिकारी आर.आर. पातळे, नायब तहसिलदार स्विप्नील दिगलवार उपस्थित होते.

श्री गुरूग्रंथ साहिब भवन येथे दोन सत्रात हे प्रशिक्षण देण्यात आले. पहिल्या सत्रात विकास माने सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नांदेड यांनी विस्तृतपणे सादरीकरणाच्या माध्यमातून मतदान प्रक्रिया सुरु करण्यापासून समाप्त होण्यापर्यंतचे प्रशिक्षण दिले. यामध्ये ईव्हीएम, व्हीव्हीपॅट यासंबंधी अभ्यासपूर्ण माहिती देण्यात आली. विविध अर्ज कसे भरतात, कोण-कोणत्या समस्या येऊ शकतात व त्या समस्यांचे उपाय कोणते याबद्दलसुद्धा प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणाच्या दुस-या टप्प्यात ईव्हीएम व व्ही‍व्हीपॅटचे प्रत्यक्ष हाताळणीबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये ईव्ही‍एमची जोडणी कशी केली जाते याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले. सर्व क्षेत्रीय अधिकारी, मतदान अधिकारी, कर्मचारी, मास्टर ट्रेनर, मंडळ अधिकारी अशा विविध अधिकारी व कर्मचारी यांना पीपीटीव्दारे निवडणूक कार्यप्रणाली व मतदान केंद्रावरील कर्तव्य, विविध फॉर्म, विविध प्रपत्रे याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. ईव्हीएममध्ये तांत्रिक दोष आढळल्यास त्याचे निराकरण कसे करावे हे चर्चेव्दारे शंका निरसन करण्यात आले. याच प्रशिक्षणात टपाली ईडीसी मतपत्रिकेबाबतही सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. निवडणूक कर्तव्यावर राहूनसुध्दा मतदान करता येईल ही जाणीव करून देण्यात आली. या प्रशिक्षण सत्राचे सूत्रसंचालन राजेश कुलकर्णी यांनी केले. हे प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी राजकुमार कोटूरवार, बालाजी जाधव, संजय भालके, आर.जी. कुलकर्णी, बाबूराव जाधव, शेख जमील व महमद आखीब तथा निवडणूक विभाग तहसिल कार्यालय नांदेड येथील सर्व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]