नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मावळ लोकसभेसाठी संजोग वाघेरे यांची उमेदवारी जाहीर – आजचा महाराष्ट्र

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मावळ लोकसभेसाठी संजोग वाघेरे यांची उमेदवारी जाहीर

प्रतिनिधी जितीन शेट्टी

रायगड (पनवेल):- महाविकास आघाडीमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आज महाराष्ट्रामधील १७ लोकसभा जागेवरील उमेदवार घोषित करण्यात आले. मावळ लोकसभा मतदारसंघासाठी संजोग वाघेरे यांची उमेदवारी आज अधिकृतरित्या घोषित करण्यात आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही यादी घोषित केली.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष व काँग्रेस पक्ष यांची मिळून महाविकास आघाडी आहे. लोकसभा जागा वाटपामध्ये मावळ लोकसभेची जागा ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाट्याला आली आहे. मागील दोन तीन महिन्यापूर्वी राष्ट्रवादी मधून शिवसेनेमध्ये प्रवेश केलेले माजी महापौर संजोग वाघेरे यांची उमेदवारी जवळपास निश्चित समजली जात होती मात्र अधिकृतपणे घोषणा झालेली नव्हती. आज मात्र उद्धव ठाकरे यांच्याकडून वाघेरे यांच्या नावाची अधिकृतपणे घोषणा करण्यात आली आहे. संजोग वाघीरे पाटील हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौर आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघांमध्ये पुणे जिल्ह्यामधील चिंचवड, पिंपरी व मावळ तर रायगड जिल्ह्यामधील कर्जत, उरण व पनवेल असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. या लोकसभा मतदारसंघांमधील मतदार संख्या ही जवळपास २५ लाख आहे. भौगोलिक दृष्ट्या अतिशय मोठा असा हा मतदारसंघ असून घाटाखालील तीन व घाटावरील तीन असे सहा मतदारसंघ यामध्ये येत असल्याने प्रचार करताना महायुती व महाविकास आघाडी या दोन्ही उमेदवारांची व कार्यकर्त्यांची दमछाक होणार आहे. मावळ लोकसभेसाठी १३ मे रोजी मतदान होणार असल्याने प्रचारासाठी एप्रिल व मे महिना मिळणार आहे. सध्या प्रचंड उष्णता वातावरणामध्ये वाढलेली आहे या रखरखत्या उन्हामध्ये उमेदवारांना व त्यांच्या कार्यकर्त्यांना प्रचार करावा लागणार आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]