नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , जळगावच्या समाजकार्य महाविद्यालयात “वोट कर – जळगाव कर” मतदान जनजागृतीपर कार्यक्रम संपन्न – आजचा महाराष्ट्र

जळगावच्या समाजकार्य महाविद्यालयात “वोट कर – जळगाव कर” मतदान जनजागृतीपर कार्यक्रम संपन्न

जळगाव :- दि. २८.लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय, जळगांव येथे निवडणूक विभागाच्या SVEEP उपक्रमाअंतर्गत आर.जे.देवा व आर.जे.शिवानी यांच्या प्रमुख उपस्थितीत मतदान जनजागृतीपर कार्यक्रम संपन्न झाला.या जनजागृतीपर कार्यक्रमात समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्सफुर्तपणे सहभाग घेऊन सेल्फी पॉईट ला सेल्फी घेऊन “वोट कर जळगांव कर” या फलकावर स्वाक्षरी मोहीम राबविली. यावेळी ‘रेडिओ जॅकी’ शिवानी यांनी “वोट कर – जळगांव कर”, “ चुनाव का पर्व देश का गर्व” ‘माझे मत- माझे भविष्य”, “मतदार राजा जागा हो -लोकशाहीचा धागा हो”, “नर असो वा नारी-मतदान ही सर्वांची जबाबदारी”, “आपल्या मताचे दान- आहे लोकशाहीची शान”, “नवे वारे नवी दिशा-मतदानच आहे उद्याची आशा” अशा विविध घोषणांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण केला.यावेळी उपस्थित ‘रेडिओ जॅकी’देवा यांनीही

उपस्थित विद्यार्थ्यांना आवाहन केले की, तुम्ही मतदार यादीत नाव नोंदवलं नसेल तर तात्काळ नाव नोंदवा, इतर मतदारांनाही नाव नोंदणीसाठी प्रेरित करा ,मतदानाप्रती नागरिकांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी प्रत्येकांनी योगदान द्यावे.समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.राकेश चौधरी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना जबाबदार नागरिक म्हणून देश हितासाठी मतदान करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमात शेवटी सर्व उपस्थितांना लोकशाहीच्या परंपरेचे जतन, निष्पक्षपाती , निर्भयपणे व कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करण्याची शपथ घेतली.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]