राज्यात पहिल्या टप्पातील लोकसभा निवडणूकीत २२९ उमेदवारी अर्ज दाखल
सचिन चौरसिया रामटेक तालुका प्रतिनिधी
नागपुर (रामटेक) :- देशात लोकसभा च्या निवडणूक ची धुमाकुळ सुरु झाली. निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असुन प्रथम टप्प्यात पूर्व विदर्भातील ५ लोकसभा निर्वाचन क्षेत्रात
निवडणूक होत आहे. त्यात नागपूर , रामटेक , चंद्रपूर, भंडारा- गोंदिया, गडचिरोली- चिमुर या ५ लोकसभा निर्वाचन क्षेत्रात लोकसभेची निवडणूक होणार असून पहिल्या टप्प्यातिल निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा काल शेवटच्या दिवस होता. शेवटच्या दिवशी १८३ उमेदवारांनी २२९ उमेदवारी अर्ज दाखल केले. या मतदार संघात १९ एप्रिलला मतदान होणार आहे.
” मतदारसंघ व दाखल अर्ज “
१) ०९- रामटेक – ५१
२) १०-नागपूर- ६२
३) ११- भंडारा- गोंदीया – ४९
४) १२-गडचिरोली- चिमुर- १९
५) १३- चंद्रपूर- ४८
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













