नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , रामटेक लोकसभे साठी महाविकास आघाडी तर्फ सौ रश्मीताई बर्वे यांनी भरला उमेदवारी अर्ज. – आजचा महाराष्ट्र

रामटेक लोकसभे साठी महाविकास आघाडी तर्फ सौ रश्मीताई बर्वे यांनी भरला उमेदवारी अर्ज.

सचिन चौरसिया सामटेक तालुका प्रतिनिधी

माजी मंत्री मा. सुनिल केदार आणि महाविकास आघाडीच्या पदाधिकारी यांच्या उपस्तिथीत.

नागपुर (रामटेक) :- महाराष्ट्रात प्रथम चरणात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीची अर्ज भरण्याची शेवटची तारीख असताना महाविकास आघाडी आणि महायुती च्या उमेदवारांनी दिनांक २७/०३/२०२४ ला माजी कँबिनेट मंत्री श्री.सुनिलजी केदार, श्री.राजेंद्रजी मुळक अध्यक्ष नागपूर जिल्हा ग्रामीन काँग्रेस कमिटी, श्री. रमेशजी बंग अन्य काँग्रेस च्या नेत्या सोबत सौ. रश्मीताई बर्बे

यांनी आपल्या उमेदवारीचा अर्ज निवडणूक अधिकारी यांना सोपवीला. या प्रसंगी बिशाँप काँटन स्कुल सदर नागपूर येथे सर्व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार साहेब), आम आदमी पार्टी व समाजवादी पार्टी महाविकास आघाडीद्वारे रामटेक मतदार संघातून महाविकास घाडीतील सर्व सन्माननीय नेतेगण कार्यकर्ते होते. बिशाँप काँटन स्कुल सदर नागपूर इथुन रॅली चे आयोजन करण्यात आले असताना हजारो च्या संख्येने महिला, व, पुरुष कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला, काँग्रेस पक्ष जिंदाबाद, रश्मीताई आगेबडो हम तुम्हारे साथ है, कहो दिलसे काँग्रेस फिरसे च्या घोषणा देत कार्यकर्ते सौ रश्मीताई बर्वे यांचा उमेदवारी अर्ज देण्यास जात असताना जनसमुदाय पहावयास मिळाले..

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]