नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , रामटेकमध्ये ७२० कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रशिक्षण – आजचा महाराष्ट्र

रामटेकमध्ये ७२० कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रशिक्षण

सचिन चौरसिया रामटेक तालुका प्रतिनिधी

नागपुर (रामटेक) :- रामटेक विधानसभा अंतर्गत लोकसभा निवडणूक २०२४ साठी संस्कृत विद्यापीठात दोन दिवसीय निवडणूक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी २२ मार्च रोजी ७२० निवडणूक कर्मचाऱ्याना दोन सत्रात प्रशिक्षण देण्यात आले. २३ मार्च रोजी देखील दोन सत्रात ७२० कर्मचारी असे एकूण १४४० कर्मचाऱ्याना प्रशिक्षण दिले जाणार आहे. एसडीओ व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी वंदना स्वरंगपते यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार रमेश कोळपे, अतिरिक्त तहसीलदार शेखर पुनसे, नायब तहसीलदार महेश, कुलदीवार, नायब तहसीलदार भोजराज बडवाईक, मुख्याधिकारी पल्लवी राऊत यांच्यासह दीडशे

प्रशिक्षित कर्मचाऱ्यांनी हे प्रशिक्षण दिले. मतदानाची संपूर्ण प्रक्रिया निवडणूक कर्मचाऱ्यांना समजावून सांगितली. सर्व नमुना फॉर्मची माहिती देण्यात आली. ८ खोल्यांमधे ईव्हीएमचे काम निवडणूक कर्मचाऱ्यांना वैयक्तिकरित्या समजावून सांगण्यात आले आणि त्यांना ईव्हीएम हाताळण्यास सांगण्यात आले.निवडणूक प्रक्रियेत सहभागी असलेले कर्मचारी मतदानापासून वंचित राहु नये म्हणून त्यांना पोस्टल बॅलेट फॉर्म भरण्यास सांगण्यात आले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]