नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , शिवसेना शहर प्रमुखपदी मा. राजेश किंमतकर यांची नियुक्ती – आजचा महाराष्ट्र

शिवसेना शहर प्रमुखपदी मा. राजेश किंमतकर यांची नियुक्ती

सचिन चौरसिया रामटेक तालुका प्रतिनिधी

नागपूर (रामटेक) :- शिवसेनेचे निष्ठावान कार्यकर्ते माजी नगरसेवक पद व महत्त्वाच्या जवाबदार्‍या सांभाळलेले आणि पक्षाच्या सर्व आंदोलनात सक्रीय असणारे राजेश किंमतकर यांची रामटेक शिवसेना शहर प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली. आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शहर प्रमुख पदावर नियुक्ती करुन शहर शिवसेनेला बळ देण्याचा प्रयत्न केला आहे. रामटेक

विधानसभेचे आमदार आशिषजी जयस्वाल यांच्या सुचनेनुसार व शिवसेना जिल्हाप्रमुख संदिपजी ईटकेलवार यांचा आदेशानुसार राजेश किंमतकर यांची नियुक्ती करण्यात आली. दरम्यान किंमतकर यांनी विविध जबाबदर्‍या सांभाळल्या आहेत. विविध निवडणुका आणि ग्रामीण भागातील पक्षाचा विस्तार याचा विचार करता शहरी चेहरा असलेले शहर प्रमुख शिंदे गटाला कितपत न्याय देऊ शकतील. अशी चर्चा सुरु झाली आहे. शहरात शिवसेना घराघरात नेणार असुन मजबुत बांधणी करणार आहे, त्यासाठी विधानसभा मतदारसंघामध्ये जाऊन कार्यकर्त्याच्या भेटीगाठी घेणार आहे. अशी प्रतिक्रिया किंमतकर यांनी व्यक्त केली. सदर कार्यक्रमाला शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थीत होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]