नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , लोकसभा निवडणूकीचे वाजले बिगुल प्रशासन लागले कामाला – आजचा महाराष्ट्र

लोकसभा निवडणूकीचे वाजले बिगुल प्रशासन लागले कामाला

सचिन चौरसिया रामटेक तालुका प्रतिनिधी 

              संपूर्ण देशात आचार सहिता लागु

रामटेक लोकसभा क्षेत्रात २०४५७१७ मतदार त्यात पुरुष १०४३२६७ स्त्री १००२३९६ तर तृतिय पंथी ५५ मतदार

नागपूर (रामटेक) :- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दि. १७ मार्च ला स्थानिक उपविभागिय कार्यालय रामटेक येथे पत्रकार परिषद पार पडली. यात आगामी लोकसभा निवडणुकीच्या आचार सहीतेबाबद विविध नियम, अटी, शर्ती तथा मार्गदर्शन उपविभागिय अधिकारी वंदना सवरंगपते यांनी उपस्थित पत्रकारांना दिली. उपविभागिय अधिकारी वंदना सवरंगपते यांनी

दिलेल्या माहितीनुसार येत्या १९ एप्रील ला आगामी लोकसभा निवडणुक होत असुन आचार संहिता लागु झालेली आहे. रामटेक लोकसभा क्षेत्रात एकुण सहा विधान सभा क्षेत्र येतात. त्या मध्ये एकुण २०४५७१७ मतदार आहे. त्या पैकी पुरुष १०४३२६७ , स्त्री १००२३९६ तर ५५ तृतिय पंथी मतदार असुन २४०५ बुथ ची व्यवस्था करण्यत आली आहे. रामटेक विधानसभा क्षेत्राची एकुण मतदार संख्या २७४८२० एवढी असुन त्यात पुरुष १३९१४४, स्त्री १३५६७२, तर ४ तृतिय पंथी मतदार असुन. ३५६ बुथ ची व्यवस्था करण्यात येणार आहे. तब्बल दोन हजार अधिकारी – कर्मचारी मतदान प्रक्रियेकामी उपस्थित राहाणार आहे. मतदान प्रक्रियेत विशेष बाब अशी की ८५ वर्षांच्या वरील वयोवृद्धांना तथा दिव्यांगांना घरपोच मतदानाची सुविधा करण्यात आली आहे. त्यामध्ये ज़्या मतदारांना मतदान कक्षापर्यंत येणे शक्य होत नसेल अशा मतदारांना २० नंबरचा फॉर्म भरून घरपोच मतदान करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. फ्लाईंग स्कॉड सुद्धा तैनात राहाणार आहे. तसेच तक्रारीसाठी कंट्रोल रूम ची व्यवस्था करण्यात आली असुन गैरप्रकार घडल्यास त्वरीत कारवाई करण्यात येणार आहे. शहरातील श्रीराम विद्यालयात महिला कार्यान्वीत बुथ ची व्यवस्था करण्यात येणार आहे. तक्रारीसाठी ०७११४२९५७६५ या क्रमांकावर संपर्क साधन्याचे तथा ज्यास्तीत ज्यास्त नागरीकांनी मतदान करावे असे आवाहन उपविभागिय अधिकारी वंदना सवरंगपते यांनी पत्रकार परिषदेत केलेले आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]