५३ व्या राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह मध्ये सुदर्शन केमिकल लिमिटेड प्रथम क्रमांक

रायगड (रोहा) :- धाटाव एम् आय डी सी मधील रोहा इंडस्ट्रीत असोसिएशन तर्फे आयोजित केलेल्या सुरक्षा सप्ताह मध्ये सुदर्शन केमिकल लिमिटेड धाटाव रोहा या कंपनीतर्फे ” रस्ता सुरक्षा, औद्योगिक सुरक्षा आणि मानवी सुरक्षा” या मुक नाट्य ला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.रायगड जिल्ह्यातील फॅक्टरी इन्स्पेक्टर आणि सुदर्शन केमिकल लिमिटेड धाटाव रोहा या कंपनीचे 
साईड हेड श्री विवेक गर्ग साहेब यांच्या हस्ते पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक स्वीकारताना श्री शिवदास बनकर साहेब, श्री गणेश भाबुंरकर साहेब, श्री दिनकर पाटील साहेब, श्री उमाकांत गायकवाड साहेब, श्री गोपाल लोखंडे साहेब, श्री रविकांत दिघे, श्री राकेश म्हात्रे, श्री दिलीप पवार, श्री परेश म्हात्रे,श्री जितेन्द्र पाटील, श्री सचिन कदम, श्री निकेत खेरडकर, श्री सुबोध महाडिक, श्री राज गोरिवले, श्री कासिफ सातविलकर , डॉ सुष्टी दवे, कुमारी प्रज्ञा घोले पुढील वर्षी सुध्दा रोहा इंडस्ट्रीत असोसिएशन तर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या नाट्य स्पर्धेत आपला नंबर अबाधितच राखण्यासाठी सर्व कलाकार मंडळी यांनी आताच आपला मनसुबा जाहीर केलेला आहे.श्री गोपाल लोखंडे साहेब दिग्दर्शित केलेल्या मुक नाट्य साठी अगदी कमी वेळेत बिनचुकपणे यशस्वीरीत्या आपली कला सादर करताना अनेक अडचणी आल्या त्यावर व्यवस्थितपणे मात करून प्रथम क्रमांकाचे मानकरी होण्याचा मान जो सुदर्शन कंपनीने घेतला तो नक्कीच कौतुकास्पद आहे या साठी सुदर्शन कंपनीतील साईड हेड श्री विवेक गर्ग साहेब, श्री गणेश भाबुंरकर साहेब, श्री अमरेश रेडकर साहेब, श्री शांताराम सोनावणे साहेब, श्री शिवदास बनकर साहेब, श्री वैभव नाईक साहेब, शिवालीका राजे मॅडम,सौ माधुरी सनस मॅडम,श्री विक्रम मोरे साहेब, श्री शिवा विक्रम साहेब,श्री दिनकर पाटील साहेब, श्री राकेश देवरे साहेब, श्री सुरेश हंबरवाडीकर साहेब, श्री गुरुविंदर सिंग साहेब यांचे उपयुक्त सहकार्य नेहमीच 
आमच्या पाठीशी ठामपणे उभे राहते.तसेच श्री संजय धोधरे, श्री राजेन्द्र शिंदे, श्री संजय पवार, श्री सुरज मानकर,या सर्वांचेच मनापासून आभार कारण तुम्ही दिलेल्या योगदानाची फारच आवश्यकता होती.आम्ही सर्व कलाकार मंडळी आपल्याला अशी ग्वाही देतो की पुढील वर्षी सुध्दा आपल्याला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक घेण्यासाठी आम्ही आमची कला सादर करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत कमी पडणार नाही याची दक्षता घेऊ पुन्हा एकदा सर्व सुदर्शन परिवारातील उच्चपदावर असणाऱ्या मान्यवरांचे आणि आपल्या सहकार्याचे मनापासून आभार मानले.
शब्दांकन:- श्री राकेश विश्वनाथ म्हात्रे
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













