नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , वडीलांच्या आधी लागणार आईचे नाव-ना.अदिती तटकरे – आजचा महाराष्ट्र

वडीलांच्या आधी लागणार आईचे नाव-ना.अदिती तटकरे

प्रतिनिधी संजय रिकामे

रायगड (तला) :- महिला सन्मानासाठी आता कायद्याने वडिलांच्या आधी आईचे नाव लावणे सक्तीचे होणार आहे. राज्याच्या नवीन महिला धोरणाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून हे धोरण जाहीर होऊन त्याची अंमलबजावणी आता केली जाणार असल्याचे प्रतिपादन महिला बालविकास मंत्री ना.अदिती तटकरे यांनी जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागामार्फत विविध शासकीय योजना लाभ वाटप कार्यक्रमात केले तळा पंचायत समिती डॉ.नाना साहेब धर्माधिकारी सभगृहात पार पडलेल्या या कार्यक्रमास जिल्हा एकात्मिक बालविकास अधिकारी निर्मला कुचिक, तहसीलदार स्वाती पाटील,पंचायत समिती प्रभारी गटविकास अधिकारी सुहास जठार,सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कराड,एकात्मिक बालविकास अधिकारी शेळके,नगराध्यक्षा माधुरी घोलप,उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे,महिला तालुका अध्यक्षा जान्हवी शिंदे,माणगाव तालुका अध्यक्ष सुभाष केकाणे,नाना भौड,अॅड.उत्तम जाधव तालुक्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस,लाभार्थी कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

            ना.अदिती तटकरे पुढे म्हणाल्या की, आतापर्यंत मुलगा किंवा मुलीला आपल्या नावापुढे केवळ वडिलांच्या नावाचा उल्लेख कायद्याने करणे बंधनकारक होते; पण जन्मदात्या आईच्या नावाचा उल्लेख करणे सक्तीचे नव्हते. मात्र, नव्या महिला धोरणात वडिलांच्या आधी आईच्या नावाचा उल्लेख सक्तीचा असेल. महिला व बालविकासमंत्री म्हणून मी हा महिला धोरणाचा मसुदा मंत्रिमंडळापुढे मांडला.त्याला मंजुरी मिळाली काही तासातच राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा यांच्या कार्यालयासमोर अजित आशा अनंतराव पवार अशी पाटी लावण्यात आली त्यामुळे या पुढे मातृशक्तीला सन्मान मिळणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.अंगणवाडी सेविका, मदतनिस, आशा वर्कर या समाजातील महत्वाच्या घटक आहेत. सेविकांकडून चांगली मुले घडविण्याचे काम होते, असे देखील प्रतिपादन ना.अदिती तटकरे यांनी केले.अंगणवाडी सेविकांना पेन्शन सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने दिले.अंगणवाडी स्मार्ट करण्याच्या उद्देशाने काम सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.अंगणवाडी सेविका मदतनीस यांची आरोग्याच्या दृष्टीने वैद्यकीय तपासणी मोफत केली जाते परंतु या पुढे त्यांच्या कुटुंबाची देखील वैद्यकीय तपासणी मोफत केली जाणार असल्याची घोषण ना.तटकरे यांनी केली.माझी कन्या भाग्यश्री योजनेंतर्गत अनेक लाभार्थींना मार्च २०२४ अखेर लाभ आदा करण्यात येत आहे. लेक लाडकी योजनेंतर्गत दिनांक १ एप्रिल २०२३ नंतर जन्मलेल्या अनेक मुलींना लाभ देण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.अंगणवाड्या सर्वंकष परिपूर्ण कशा होतील यासाठी कटिबध्द असल्याचे सांगून त्यांनी सर्वांचे आभार मानले.

               

प्रारंभी महिला बालकल्याण मंत्री ना.अदिती तटकरे व मान्यवरांनी अंगणवाडी सेविका, मदतनिस यांच्यामार्फत बनविलेल्या विविध पौष्टीक खाद्य पदार्थांच्या लावण्यात आलेल्या स्टॉलना भेट देवून याबाबत त्यांनी महिलांचे कौतुक केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते महिलांना विविध लाभ वाटप करण्यात आले. कार्यक्रमास तळा आणि माणगाव तालुक्यातील अंगणवाडी सेविका, मदतनिस मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]