प्रा. शिल्पा सरोदे (आष्टणकर) यांना आचार्य पदवी
सचिन चौरसिया रामटेक तालुका प्रतिनिधी
नागपूर (रामटेक):- कविकुलगुरू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स (किट्स), रामटेक येथील प्रा. शिल्पा भाऊराव सरोदे (आष्टणकर) यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग मधे आचार्य (पीएचडी) पदवी प्रदान केली आहे. यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालय, नागपूरचे डॉ.

सुमंत कडवाने यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी “डिझाईन आणि डेव्हलपमेंट ऑफ डिझायरेबल कंट्रोल स्ट्रॅटेजी फार ग्रिड टाइड पीव्ही बेस्ड सिंगल फेज क्वाझी-झेड सोर्स इन्व्हर्टर” या विषयावर शोध प्रबंध सादर केला होता. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय किट्सचे सचिव व्ही. श्रीनिवास राव, प्राचार्य डॉ. अविनाश श्रीखंडे, विभागप्रमुख प्रा. भानुदास टाले, पती डॉ. पंकज आष्टणकर, इतर कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय याना दिले.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













