जागतिक जल दिनानिमित्त ग्रीन क्लब अंतर्गत विविध उपक्रम
सचिन चौरसिया रामटेक तालुका प्रतिनिधी
नागपूर (रामटेक) :- दमयंतीताई देशमुख बी.एड व डी.एड कॉलेज, रामटेक येथील संस्थाध्यक्ष रविकांत रागीट तथा प्राचार्या जयश्रीताई देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व ग्रीन क्लब समन्वयक प्रा. देवानंद नागदेवे यांच्या नियंत्रणाखाली दि. १३ मार्च ते १४ मार्च २०२४ या दोन दिवसांमध्ये जागतिक जल दिनानिमित्त ग्रीन क्लब अंतर्गत विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले .बुधवारला महाविद्यालयात असलेल्या पिण्याचा पाण्याचा नळाचे पाणी बाहेर जाऊ नये तसेच त्या पाण्याचा दुरुपयोग होऊ नये या अनुषंगाने

विद्यार्थ्यांनी त्या पाण्याची योग्य विल्हेवाट लागावी या करिता तिथला पाणी झाडांना मिळावा यासाठी नाली बनवून वाहत असलेला पाणी झाडांना दिले त्यातून जल वाया जाणार नाही आणि वृक्षांना पण त्याचा फायदा होईल याची काळजी घेतली. गुरुवारला महाविद्यालयापासून २:०० किमी अनंतरावर असलेल्या नगरधन गावात जाऊन विद्यार्थ्यांनी पाणी कसे वापरावे आणि पाण्याचा अपवेय केल्यास त्याचे दुष्परिणाम भविष्यात काय होतील हे गावातील लोकांना पथनाट्याच्या माध्यमातून पटवून सांगितले तसेच ” जल है तो कल है ” असे घोषवाक्य म्हणत गावकऱ्यांना पाण्याबद्दल जागृत केले कार्यक्रमाला बी.एड. च्या विभागप्रमुख प्रा.उर्मिला नाईक, डी.एड.च्या विभागप्रमुख प्रा.शालू वानखेडे, ग्रीन क्लब समन्वयक प्रा.देवानंद नागदेवे, प्रा.अनिल मिरासे, प्रा.विलास मडावी, प्रा.किरण शेंद्रे, प्रा.चेतना उके, प्रा.कला मेश्राम, प्रा.मयुरी टेम्भुरने, प्रा. ज्ञानेश्वर नेवारे, प्रा.डॉली कळमकर, प्रा.मेघा जांभुलकर, प्रा.अमित हटवार, प्रा.आकाश मोहबिया, सुरेश कारेमोरे, गीता समर्थ, अतुल बुरडकर, निकिता अंबादे, राजेंद्र मोहनकर,निकिता फाये, संदीप ठाकरे इत्यादी सह बऱ्याच संख्येत गावकरी मंडळी व विद्यार्थी उपस्थित होते
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













