रामटेक बसस्थानक परिसरातील अतिक्रमने हटविली
तालुका प्रतिनिधी सचिन चौरसिया रामटेक
नागपूर (रामटेक) :- नगरपालिका रामटेक मुख्याधिकारी पल्लवी राउत यांच्या मार्गदर्शनात बस स्थानक परिसरातील समोरील अतिक्रमण नगरपालिका रामटेक द्वारा हटविण्यात आले. पुढील टप्प्यात बस स्थानक ते गांधी चौक व गांधी चौक कडून जाणारे सर्व रस्ते मोकळे करण्यात येतील. दुकानदारानी केलेले स्थायी स्वरूपाचे बांधकाम तात्काळ हटवून नगरपालिकेस सहकार्य करावे असे आव्हान मुख्याधिकारी पल्लवी राउत यांनी केले. विशेष बाब म्हणजे रामटेक बस स्थानक व्यवस्थापक उमा तिवारी यानी बस स्थानक समोरिल अतिक्रमण हटविन्याची मागणी नगरपालिकेस केली होती. त्याची दखल घेऊन कार्रवाई केली.

मुख्याधिकारी पल्लवी राउत यांनी सांगितले की बऱ्याच दिवसांपासून बंद असलेले ९ दुकान दुकान ट्रेलर द्वारे उचलून जप्त करण्यात आले. प्रतिबंधीत असलेले प्लास्टिक, खर्रा प्लास्टिक सुद्धा जप्त करण्यात आले. बसस्थानक च्या पुढे असलेले सर्व दुकान हटविण्यात आले. अग्निशमन केंद्राला लागून असलेली त्रिकोणी जागा सुद्धा पूर्णत अतिक्रमणमुक्त करण्यात आली. रामटेक एन्ट्री पॉइंट ते मुरमुरा भट्टी पर्यंत ची सर्व्हिस रोड वरील सर्व दुकाने ज्यांनी खूप मोठ्या प्रमाणत जागा घेतली होती त्यांना उदरनिर्वाह करिता समप्रमाणत जागा देण्यात आली. फूटपाथ च्या खाली असलेले सर्व प्रकारचे साहित्य हटविण्यात आले. बसस्थानक परिसर व त्यापुढे गांधी चौक कडे जाणारे सर्व रस्ते मोकळे करण्यात येतील.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













