नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , महसूल प्रशासन रोहा रायगड मधील तत्कालिन कार्यरत तलाठी सजा भुवनेश्वर श्री एम.पी.मळेकर यांचा भ्रष्ट घोटाळेबाज कारभार. या भ्रष्ट कारभारात रोहा ग्रुप ग्रामपंचायत वरसेचा सहभाग यांचा भ्रष्ट कारभाराविरुद्ध मा.विभागीय आयुक्त कोकण भवन, महसूल कोकण विभाग यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल. – आजचा महाराष्ट्र

महसूल प्रशासन रोहा रायगड मधील तत्कालिन कार्यरत तलाठी सजा भुवनेश्वर श्री एम.पी.मळेकर यांचा भ्रष्ट घोटाळेबाज कारभार. या भ्रष्ट कारभारात रोहा ग्रुप ग्रामपंचायत वरसेचा सहभाग यांचा भ्रष्ट कारभाराविरुद्ध मा.विभागीय आयुक्त कोकण भवन, महसूल कोकण विभाग यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल.

पत्रकार समीर बामुगडे 

रायगड (रोहा) :- मौजे भुवनेश्वर, तालुका रोहा येथील सर्वे नं.३७/२ब ,प्लॉट नंबर १० क्षेत्र ०४.००००हे मा. जिल्हाधिकारी रायगड अलिबाग यांचे कडील आदेश क्रमांक मशा/एल एन ए.१(ब)/एस.आर.४११/२०१०दि.०६/०६/२०१२ स.न ३८/३. बिनशेती रेखांकनात जाणेयेणेसाठी ९मीटर रुंद रस्त्यासाठी आरक्षित आहे, सदरचे आरक्षित रस्त्याचे भूखंडावर श्री ओम प्रकाश श्रीनाथ मिश्रा यांनी बिनशेती आदेशातील अटीशर्तीचा भंग करून ३ मजली आरसीसी इमारतीचे अनधिकृत बांधकाम केले आहे, सदरचे इमारतीचे बांधकाम होण्याअगोदरच तत्कालीन कार्यरत तलाठी श्री एम.पी.मळेकर यांनी दि.२९/०७/२०१४ रोजी सदरचे आरक्षित जागेवर इमारत बांधकाम झाल्याचे दाखवून भोगवटादार श्री ओमप्रकाश श्रीनाथ मिश्रा यांना २०,००० हजार रुपये दंड आकारणी केली आहे. सदरचा घोटाळा तलाठी सजा भुवनेश्वर ता. रोहा यांचे कडून माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीवरून उघड झाली आहे.

या बेकायदेशीर अनधिकृत इमारत बांधकामास स्थानिक स्वराज्य संस्था व महसूल प्रशासनातील तलाठी मंडळ अधिकारी जबाबदार असून, यांच्या पाठिंब्याने उभी राहिली आहे, संबंधित महसूल प्रशासनातील जबाबदार तलाठी मंडळ अधिकारी यांनी सदरचे अनधिकृत इमारत बांधकाम त्वरित निष्कासित करण्याची कारवाई करण्याचे टाळून सदरचे भोगवटादार श्री ओमप्रकाश श्रीनाथ मिश्रा यांचे बरोबर हातमिळवणी व साठेलोटे करून अनधिकृत आरसीसी इमारत बांधकामास ७/१२वर अनधिकृत बांधकाम दंडाची रक्कम रु. १७५९२०चा.बोजा फेरफार नोंद क्र.४०७७अन्वये दि.३०/१२/२०२२रोजी चढविलेले आहे , या अनधिकृत बांधकामास संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था व महसूल प्रशासनातील जबाबदार तलाठी/ मंडळ अधिकारी हे जबाबदार आहेत,

या प्रकरणात त्यांची सखोल चौकशी करून कायद्यातील तरतुदी नियमानुसार कारवाई करण्यात यावी, सदरचे आरक्षित जागेवरील अनधिकृत बेकायदेशीर इमारत बांधकाम त्वरित निष्कासित करावे,त्याचबरोबर श्री ओमप्रकाश श्रीनाथ मिश्रा यांनी मा.जिल्हाधिकारी रायगड अलिबाग यांचे कडील सदरचे घेतलेले बिनशेती परवानगी त्वरित रद्द करण्यात यावी व संबंधित अतिक्रमण धारकावर फौजदारी गुन्हा दाखल करून सर्वे नंबर ३८/३ ,३८/४,३८/६ मिळकतीत अटीशर्तीचा भंग करून, मिळवलेल्या बिनशेती परवानगी त्वरित रद्द करण्यासाठी मा.विभागीय आयुक्त कोकण भवन,( महसूल )विभाग कोकण तसेच मा. जिल्हाधिकारी रायगड अलिबाग (नगररचना विभाग) यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल.माहिती अधिकार कार्यकर्ताश्री रवींद्र चंद्रकांत चव्हाण.आदर्श नगर, भुवनेश्वर तालुका रोहा, जिल्हा रायगड.मो.नं :8793468658.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]