जालन्यात गजानन तौर यांच्यावर अज्ञातांचा गोळीबार, गजानन तौर अर्जुन खोतकर यांचे कट्टर समर्थक होते

जालना :- दिनांक १२/१२/२०२३ याविषयी सविस्तर माहिती अशी की, सोमवारी जालन्यात गजानन तौर यांच्यावर अज्ञातांनी गोळीबार केला असून गजानन तौर यांचा या गोळीबारात मृत्यू झाला असून गजानन तौर हे अर्जुन खोतकर यांचे कट्टर समर्थक होते.शहरातील मंठा चौफुलीवर काही अज्ञातांनी गजानन तौर यांच्यावर गोळीबार केला.या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले होते.त्यांना तातडीने शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.यावेळी रुग्णालयात माजी मंत्री अर्जुन खोतकर आणि शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रार्थमिक माहितीनुसार मंठा चौफुली 
भागातील होंडा शोरूमसमोर ही गोळीबाराची घटना घडली आहे.गजानन तौर हे रामनगर कारखान्यांकडून जालनाकडे त्यांच्या चारचाकी वाहनाने येत होते.पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या तिघांनी गजानन तौर यांच्यावर गावठी पिस्तूलातुन चार गोळ्या झाडल्या. चार गोळ्यांपैकी तीन गोळ्या गजानन तौर यांना लागल्या,तर एक गोळी चाटून गेली.घटनेची माहिती कळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली.सदरील घटनेची माहिती शहरात पसरताच घटनास्थळी तसेच खाजगी रुग्णालयात नागरिकांचा मोठा जमाव झाला होता.यानंतर पोलीसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.तौर यांचा मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला असून पोलीसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले असल्याची माहिती देण्यात आली असून आरोपींकडून आणखी माहिती विचारली जात असल्याची माहिती देण्यात आली आहे.या घटनेवरून जालना शहरासह जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था संपुष्टात आली असल्याचा प्रत्यय आला असून पोलीस प्रशासनाचे लक्तरे वेशीवर टांगले असल्याची चर्चा जालना शहरात तसेच जिल्ह्यांत सुरू आहे.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













