स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या केलेल्या अपमानजनक वक्तव्याबद्दल माणगाव तालुका युवा मोर्चा च्या वतीने कर्नाटकचे काँग्रेसचे मंत्री प्रियांक खर्गे यांचा फोटो जाळून निषेध नोंदवला

रायगड (माणगाव) :- स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणे, त्यांच्याबद्दल अपशब्द बोलणे, स्वातंत्र्यवीरांचा अनुल्लेख करणे,स्वातंत्र्य लढ्यातील त्यांच्या सहभागाबद्दल शंका उत्पन्न करणे आणि याबद्दल सर्वसामान्य लोकांच्या मनात गैरसमज पसरण्याचा प्रयत्न करणे हे एकच काम काँग्रेसकडे शिल्लक आहे. 
त्यासाठी काँग्रेस पार्टी वारंवार प्रयत्न करत आहे. कर्नाटक राज्यातील काँग्रेसचे मंत्री आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र प्रियांक खर्गे यांनी काँग्रेसच्या धोरणाप्रमाणे सावरकरांचा अपमान करून स्वातंत्र्यवीरांचा देशाचा अपमान केला आहे. या घटनेचा आता राज्यभरातून निषेध केला जात असून दक्षिणजिल्हा अध्यक्ष धैर्यशील पाटीलसाहेब यांच्या मान्यतेने रायगड जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष निलेशजी थोरे तसेच माणगाव तालुका भाजप अध्यक्ष उमेशजी साटम यांच्या नेतृत्वाखाली माणगाव तालुका युवा मोर्चा अध्यक्ष रितेशजी निवाते यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये माणगाव मुख्य रस्ता, बस डेपो समोर . युवा कार्यकर्त्यांनी कर्नाटक च्या काँग्रेस चे मंत्री प्रियांक खर्गे याचा फोटो जाळून निषेध नोंदवला यावेळी जिल्हा कार्यकारणी सदस्य चिन्मयजी मोने व तसेच उत्तर भारतीय सेल अध्यक्ष आनंदजी राजभर तालुका सरचिटणीस युवराजजी मुंडे तालुका उपाध्यक्ष योगेशजी पालकर व तसेच राजेंद्रजी गाडे उपतालुका अध्यक्ष नीलेश राशीनकर संजय जुमारे शुभम पवार अजय पवार परेश सांगळे युवा मोर्चा शहराध्यक्ष राजू तेडगुरे सदस्य मंदार मडवी रिपु पासवान सुशील पालकर व तसेच तालुक्यातील इत्यादी मान्यवर उपस्थित होते .
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













