श्रीवर्धन म्हसळा मार्गावर वाहनांच्या डिझल गळतीमुळे मोटरसायकल घसरल्या
प्रतिनिधि रामचंद्र घोडमोडे
रायगड (श्रीवर्धन) :- श्रीवर्धन म्हसळा मार्गावर अज्ञात वाहनांच्या टाकी मधील डिझल गळतीमुळे अपघाताच्या घटना घडल्या आहेत. रस्त्यावर पसरलेले डिझल लक्षात न आल्याने या घटना घडल्या असून याचा सर्वाधिक फटका मोटरसायकल स्वारांना बसला असून यामध्ये आडी ग्रामपंचायत नवनिर्वाचित सरपंच यांचा सुद्धा समावेश आहे. श्रीवर्धन मधील काम संपल्यानंतर आपल्या गावी जात असताना ही घटना घडल्याचे त्यांच्या कडून सांगण्यात येत आहे. स्कुटीला जास्त स्पीड नसल्याने किरकोळ मार लागल्याचे त्यांनी सांगितले. तर अशाच प्रकारे अनेक मोटरसायकल सुद्धा इथे घसरल्याच्या या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. तरी संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन. जीवित हानी टाळण्यासाठी डिझल टाकी मधून गळती चालू असलेल्या वाहनांवर कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत असुन या मार्गावर चालणाऱ्या बस व ट्रकच्या डिझल टाकी फुल केल्यानंतर टाकीचे झाकण व्यवस्थित बंद न झाल्याने वळणावर डिझल पडत असल्याचे नागरिकाकडून सांगण्यात येत आहे.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













