नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , पेण खारेपाट विकास संकल्प संघटनेचे विविध् मागण्या साठी वाशी येथे आमरण उपोषण… – आजचा महाराष्ट्र

पेण खारेपाट विकास संकल्प संघटनेचे विविध् मागण्या साठी वाशी येथे आमरण उपोषण…

 

प्रतिनिधि सुरेश तांडेल

रायगड (पेण – खारपाडा) :- रायगड जिल्ह्यातील पेन तालुक्या मधील पेण खारेपाट विकास संकल्प संघटनेतर्फे वाशी येथे आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. हे आंदोलन विविध प्रकारच्या मागण्यान साठी करण्यात आले आहे. ह्या आंदोलनातील उपोषण साठी सौ. नंदा म्हात्रे – कणे, हेमंत पाटील – वाशी, जितेंद्र ठाकूर – ठाकूरबेडी, अभि म्हात्रे – भाल विठ्ठलवाडी, दिलीप म्हात्रे – भाल विठ्ठलवाडी, स्वप्निल म्हात्रे – सरेभाग, चंद्रहास म्हात्रे – वढाव, सौ.अश्विनी ठाकूर – दादर, अजित पाटील- वाशी हे उपोषणास बसले आहेत. यावेळी राजन झेमसे, काँग्रेस तालुका अध्यक्ष अशोक मोकल, शिवसेना उबाठा गट तालुका प्रमुख जगदीश ठाकूर, प्रदीप वर्तक, बाळू पाटील, जीवन पाटील, योगेश पाटील, नितीन पाटील, संदीप ठाकूर, अनंत पाटील, रोहिदास नाईक, प्रकाश माळी व इतर अनेकांनी उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणाल पाठिबा दर्शविला. पेण खारेपाट विकास संकल्प संघटनेमार्फत हेटवणे कालव्याचे पुढील कामाचे चतुर्थ सु.प्र.मा.प्रस्तावास मंजूरी मिळावी व खारेपाटातील पिण्याच्या पाण्याशी संबधित इतर सर्व मागण्या पूर्ण कराव्यात यासाठी वाशी येथील जगदंबा देवीचे प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या शेजारी हे आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. १. जलसंपदा विभाग हेटवणे मध्यम प्रकल्पाचे जा.क्र. कोंपाविम/तां.४/हेटवणे सु.प्र.मा/३३०७/सन २०२३ दिनांक २६ सप्टेंबर २०२३ रोजीच्या जलसंपदा विभागाचे मुख्यसचिवांना सादर केलेल्या सुधारीत चतुर्थः सु.प्र.मा.प्रस्तावास ③ जलसंपदा मंत्रालयाच्या कॅबिनेट मिटींगची मंजूरी मिळून योजनेचे पुढील

टप्यातील कामाचे निविदेचे आदेश होवून कालव्याचे काम सुरु करावे.२. हेटवणे धरण ते शहापाडा धरण वाढीव उद्भव पाणीपुरवठा योजनेचे काम तातडीने पूर्ण करुन खारेपाटातील जनतेला शुध्द व मुबलक पाणी मिळावे.३. जलजीवन मिशन अंतर्गत सार्वजनिक वितरण व्यवस्था पाणी पुरवठा योजनेचे काम दिलेल्या मुदतीमध्ये पूर्ण करावे.४. खारेपाटातील शेतकऱ्यांना हक्काचे सिंचनाचे पाणी वितरीत करावे. या मागण्यासाठी हे उपोषण सुरू करण्यात आले आहे.हे आंदोलन आज दिनांक ७ डिसेंबर रोजी पेन तालुक्यातील वाशी येथील जगदंबा देवीच्या प्रांगणातील छात्रपती शिवाजी महाराज्याच्या पुतळ्या पाशी करण्यात आले आहे. जो पर्यंत मागण्या मान्य होत नाही तो पर्यंत हे आमरण उपोषण असेल असे पेन खारेपाट विकास संकल्प संघटनेने निर्धार केला आहे .

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]