नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , किल्ला गावामध्ये चोरीचा प्रकार उघड – आजचा महाराष्ट्र

किल्ला गावामध्ये चोरीचा प्रकार उघड

प्रतिनिधि महेश भोकटे

रायगड (रोहा) :- कु. सुरज राधेश्याम कुशवाह रा. किल्ला वय वर्ष १८ हा बेबी गणपत घाडगे यांच्या रूम मध्ये भाडेकरू असून दि. ०५/१२/२०२३ रोजी महेंद्र वेटू कापसेयांचा भाचा असल्यामुळे त्यांच्या घरी येणे-जाणे असल्या मुळे त्याने त्यांच्या राहत्या घरातील कपाटातील ४२००० रु चोरून ते आपल्या भाड्याच्या रूम मध्ये लपवून ठेवले आणि पळून जात असताना श्री. शरद हरिभाऊ मुंढे यांनी तत्परता दाखवून त्याला धाटाव स्टॉप जवळ पकडले व

पोलिसांच्या ताब्यात दिले असता पोलिस साहेब हेमंत धायगुडे व शिंदे साहेब यांनी चोकशी करून चोरी केलेला मुददेमाल जप्त करून त्याच्यावर कलम ३८० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे व पुढील कारवाई करत आहेत. तरी अशा भुरट्या चोराला योग्य ती शिक्षा मिळायलाच पाहिजे अशी मागणी किल्ला गावातील समस्त महिला वर्गाची आहे. आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी घेण्यात यावी. पोलिस धायगुडे सर आणि शिंदे सरांचे गावातील युवकांनी आभार मानले आहेत तसेच गावातील युवकांनी धायगुडे साहेबांना सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]