नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , निष्काम कर्मयोगी होणाऱ्या कार्यक्रमाचे निमंत्रण जय बाबाजी उत्तर अधिकारी १०८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज जाणेफळ गायकवाड यांनी दिले – आजचा महाराष्ट्र

निष्काम कर्मयोगी होणाऱ्या कार्यक्रमाचे निमंत्रण जय बाबाजी उत्तर अधिकारी १०८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज जाणेफळ गायकवाड यांनी दिले

प्रतिनिधि श्रीकृष्ण शेळके

जालना :- जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील जानेफळ येथे निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या ३४ व्या पुण्यस्मरणार्थ श्रीक्षेत्र नाशिक तपोवन कुंभमेळा मैदान जिल्हा नाशिक येथे जय श्रीराम निष्काम कर्मयोगी धर्मसोहळा दिनांक १७ डिसेंबर ते २४ डिसेंबर २०२३ या दरम्यान होणाऱ्या कार्यक्रमाचे निमंत्रण म्हणून बाबाजींचे उत्तर अधिकारी श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी जी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तालुका भोकरदन जानेफळ गायकवाड, खंडाळा हसनाबाद, आधी गावामध्ये दिनांक ०४ डिसेंबर सोमवार रोजी भक्ती

फेरी कार्यक्रम संपन्न झाला.. बाबाजी च्या पालखी समोर शाळेतील विद्यार्थी बालगोपाल संत गजानन भजनी मंडळ वाकडी नागेश्वर महिला भजनी मंडळ जानेफळ टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये माता भगिनी फुगडी खेळून बाल गोपाल नी आनंद उत्सव साजरा केला

त्यानंतर बाबाजी चे प्रवचन झाले, व्यसनमुक्त जीवन जगा माता पिता गुरुचा आदर सन्मान करा असा उपदेश बाबांनी यावेळी केला बाबाजी चा अमृतवाणी नंतर महाप्रसाद वाटप करण्यात आला यावेळी अनवा, वाकडी,कोकडी, वाडी, मलकापूर, खंडाळा, जयपुर कोठारा, सारोळा, हसनाबाद, कोदा, आधी गावातील जय बाबाजी भक्त परिवाराची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.. जय बाबाजी

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]