नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , कुंडलिका नंदी पात्रात केमिकलचे सांडपाणी सोडणा-या भूरट्या चोरावर कारवाई करण्याची मागणी? – आजचा महाराष्ट्र

कुंडलिका नंदी पात्रात केमिकलचे सांडपाणी सोडणा-या भूरट्या चोरावर कारवाई करण्याची मागणी?

प्रतिनिधि समीर बामुगडे

रायगड (रोहा) :- रोहा तालूक्याची भाग्य लक्ष्मी म्हणून ओळख असणा-या कुंडलिका नदीमध्ये दीपावलीच्या पुर्व संधेला कुंडलिका नदी पात्रात केमिकलचे सांडपाणी खाजगी वाहनाच्या सहाय्याने सोडणाऱ्या वाहन चालकाचा शोध घेऊन तात्काळ गुन्हा दाखल

करावा अशी मागणी सचिन चोरगे व रोहा तालुक्यातील नागरिकांकडून करण्यात येत आहे. कुंडलिक नदी पात्रामध्ये मोठया प्रमाणात मासे मृत झाले असल्याचे निदर्शनास आणून दिले असताना या कुंडलिका नदीचे प्रदुषण करणाऱ्यांकडे प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिका-यांनी नेहमीच दुर्लक्ष केले आहे रोहा औधौगिक विकास महामंडळ या कार्यालयात ग्रामस्थ उदवणे, रोठखुर्द, व रोठ

बुद्रुक, यांनी भेट देवून ग्रामस्थाना सांगण्यात आले की सदर बाब प्रदूषण नियंत्रण मंडळाला कळवण्यात येईल व तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सांडपाणी वाहून नेणारे चेंबर्स अथवा पाईपलाईन कुठेही ओव्हरफ्लो अथवा लिकेज नसल्याचे ग्रामस्थासोबत केलेले पाहणीत आढळून आले नाही, कुंडलिक नदीत रात्री अपरात्री भूरट्या चोरानी अंधाराचा फायदा आणि शासकीय सुट्टीचा फायदा घेऊन नदी पात्रात घातक रसायन सोडण्यात आले असून या चोरांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]