नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी आयोजित गड किल्ल्यांच्या स्पर्धा – आजचा महाराष्ट्र

राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी आयोजित गड किल्ल्यांच्या स्पर्धा

प्रतिनिधी रामचंद्र घोडमोडे

किल्ल्यांची पाहणी करताना राष्ट्रवादी शहर अध्यक्ष जितेंद्र सातनाक 

रायगड (श्रीवर्धन) :- सध्याच्या इंटरनेटच्या काळात नवतरुणांना प्राचीन काळातील गड किल्ल्यांची आवड तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेल्या पराक्रमांची माहिती व्हावी, युवकांमधील कलागुणांना वाव मिळण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे गडकिल्ले

स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेला तरुणांकडून ही चांगला प्रतिसाद मिळाला असून प्रतापगड. उंदेरी. कुलाबा. सिंहगड. जंजिरा पद्मदुर्ग. पुरंदर. या किल्ल्यांच्या हुबेहूब प्रतिकृती तयार करण्यात आल्या आहेत.किल्ले पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेले पराक्रम तसेच किल्ल्यांबद्दल

माहिती स्पर्धकांकडून दिली जात आहे.किल्ला स्पर्धे मध्ये एकूण ३५ पेक्षा जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदविला असून .तरुणांनी बनवलेल्या किल्ल्यांची पाहणी राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष जितेंद्र सातनाक.यांच्या समवेत माजी नगरसेवक बाळकृष्ण चाचले. माजी नगरसेवक सुनील पवार.दत्ता कोसबे. भावेश मांजरेकर. निलेश सातनाक. दिनेश पोरनाक. मेहुल पोलेकर. दिनेश नागवेकर . देवेश पवार आर्चीत पोलेकर. यांच्याकडून करण्यात आली.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]