नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , गोरेगाव मांजरोणे विभागातील वनी पुरार ग्रामपंचायत मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार – आजचा महाराष्ट्र

गोरेगाव मांजरोणे विभागातील वनी पुरार ग्रामपंचायत मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार

प्रतिनिधि पांडुरंग माने

राष्ट्रवादीच्या नुकत्याच निवडून आलेल्या ३ सदस्यांसह असंख्य कार्यकर्ते महिला भगिनींसह शिवसेनेत दाखल

रायगड (माणगाव) :- माणगांव तालुक्यातील महाड विधानसभा मतदार संघातील गोरेगांव माणगाव विभागातील गोरेगांव मांजरोणे विभागातील वनी पुरार ग्रामपंचायती मधील ३ सदस्यांनी महाड पोलादपूर माणगांवचे कार्यसम्राट आमदार भरतशेठ गोगावले यांचे नेतृत्वावर विश्वास ठेवत आपल्या असंख्य महिला व पुरुष कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला,त्यामुळे वनी पुरार ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पडले आहे.माणगांव तालुक्यातील गोरेगाव शहरानजिक मांजरोणे विभागात असलेल्या वनी पुरार ग्रामपंचायती मधील वनी मोहल्ला व नवी वाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रामपंचायत सदस्य आदिल मोहम्मद अकिल देशमुख, मुनावर म. अली नाटेकर, नफीसा शहाबुद्दीन उभारे यांनी

आपल्या असंख्य सहकार्‍यांसह महाड पोलादपूर माणगांवचे आमदार भरतशेठ गोगावले यांचे उपस्थितीत ढालकाठी येथील (शिवनेरी)निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश केला. वनी पुरार ग्राम पंचायती मधील शिवसेनेचे सदस्य सरीता हरिश्चंद्र पिंचुर्ले उपस्थित होते.यावेळी मोअज्जम बुऱ्हाणपुरे,सरफराज उमलकर,नईम अजीम जोगीलकर,गुलाम गौस सरखोत,अल्फान परांदे,समीरा आसिफ सरखोत,झुहेब आसिफ सरखोत, सुमाया शुएब सरखोत, हाफीझा मोअज्जम बुर्‍हाणपुरे नाझिया तन्वीर सरखोत, हुस्नाबानू सरखोत जयसिंग पवार,शोभा जयसिंह पवार,आशा ठोंबरे,संगिता पाटेरे,प्रतिमा प्रकाश साबळे,शशिकांत परावे,यशवंत परावे यांनी शिवसेनेत प्रवेश केला.प्रवीण समारंभ वेळी उपस्थित उपतालुकाप्रमुख प्रकाश गोरिवले,विभागप्रमुख शरीफभाई हार्गे, माजी सभापती सुजित शिंदे रामभाऊ म्हस्कर, विभाग प्रमुख नंदु पद्रत, अल्प संख्याक तालुकाप्रमुख सज्जात गोडमे, रफीक वजगरे इत्यादी विभागातील शिवसेना युवा सेनेचे आजी माजी पदाधिकारी लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]