एकच मिशन – जुनी पेन्शन” चा जयघोष… जुनी पेन्शन मागणी करिता महामोर्चा…
प्रतिनिधि पनवेल
रायगड (पनवेल) :- राज्य शासकीय सेवेत ०१ नोव्हेंबर २००५ नंतर दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती पेन्शन योजना लागू करावी व नवीन अंशदायी पेन्शन योजना रद्द करावी या मागणीसाठी 
सर्व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी दिनांक ०८ नोव्हेंबर २०२३ रोजी राज्यव्यापी जाहीर मोर्चाचे आयोजन केले होते. पनवेल येथे देखील बुधवार, दिनांक ०८ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ११ :०० वाजता पंचायत समिती, पनवेल येथून “एकच मिशन – जुनी पेन्शन” ची घोषणा देत मोर्चा तहसील कार्यालय, पनवेल येथे पोहोचल्यावर महाराष्ट्र राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या शिष्टमंडळातर्फे मा. तहसिलदार साहेब पनवेल यांना निवेदन देण्यात आले.सदर मोर्चात 
पनवेल शहर व तालुक्यातील सर्व राज्य शासकीय कर्मचारी, निमशासकीय कर्मचारी, शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी, प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेल (RTO) कार्यालयातील कर्मचारी सहभागी झाले असून, सदर मोर्चाबाबत मार्गदर्शन श्री. प्रशांत विरकुड यांनी केले, तसेच मोर्चाची रूपरेषा श्री.आरिफ शेख यांनी मांडली व निवेदनाचे वाचन श्री. सोमनाथ गोरे यांनी केले. सदर वेळी मोर्चामध्ये श्री. राजेश झेंडेकर, श्री. संजय हिवरे, श्री. राजेंद्र सूर्यवंशी, श्री. अजय तरवाळ, श्री. संदीप बासरे, श्री. नितेश भगत, श्री. मोहन काटोळे, श्री. लालासाहेब गोपाळघरे, श्री. गणेश कारंडे, श्री. स्वप्नील मुंडकळे, श्री.शरद शिंदे, श्री. लक्ष्मण बर्गे हे कर्मचारी उपस्थित होते.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













