नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , ग्रुप ग्रामपंचायत गाणीच्या सरपंच पदी आदित्य कासरूंग यांची निवड – आजचा महाराष्ट्र

ग्रुप ग्रामपंचायत गाणीच्या सरपंच पदी आदित्य कासरूंग यांची निवड

प्रतिनिधी रामचंद्र घोडमोडे

रायगड (श्रीवर्धन) :- श्रीवर्धन तालुक्यातील अतिशय दुर्गम भागात वसलेल्या गाणी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये कोंढे तर्फे श्रीवर्धन येथील आदित्य संतोष कासरूंग यांची सरपंच पदी तसेच सात सदस्यांची निवड बिनविरोध झाली.ग्रामपंचायत मधील दोन्ही गावे राष्ट्रवादी काँग्रेसचे बालेकिल्ले म्हणून समजले जातात गावातील नागरिकांनी नवयुवकांवर विश्वास ठेवून संपूर्ण ग्रामपंचायत तरुणांच्या हाती देऊन नव्या युगाचा प्रारंभ केला आहे. बिनविरोध निवडून

दिलेल्या सदस्यांमध्ये सुभाष उजळ आत्माराम रहाटवल .निखिल कदम. सौ.तनिषा आंब्रस्कर सौ.चांदणी कासरूंग सौ.विशाखा उजळ सौ.श्रेया रहाटवल यांची सदस्य पदी वर्णी लागली आहे. नवनिर्वाचित सरपंच आदित्य कासरुंग आमच्या प्रतिनिधीशी बोलत असताना विकासात्मक धोरण घेऊन ग्रामपंचायतीतील दोन्ही गावांचा विकास करून ग्रामपंचायतला महाराष्ट्रात नाव मिळवून द्यायचे आहे असे प्रतिपादन व्यक्त केले असुन दोन्ही गावातील नागरिकांनी विश्वास दर्शवत सरपंच तसेच सदस्य बिनविरोध निवडून दिल्या बाबत आभार व्यक्त केले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]