नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , ज्ञान विकास संस्थेच्या ॲड.पी.सी. पाटील विधी महाविद्यालयामध्ये प्रथमच ॲड. श्री. राम आपटे ( उच्च न्यायालय, मुंबईचे वरीष्ठ अधिव्याख्याता ) सरांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. – आजचा महाराष्ट्र

ज्ञान विकास संस्थेच्या ॲड.पी.सी. पाटील विधी महाविद्यालयामध्ये प्रथमच ॲड. श्री. राम आपटे ( उच्च न्यायालय, मुंबईचे वरीष्ठ अधिव्याख्याता ) सरांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

प्रतिनिधि नवी मुंबई

नवी मुंबई :- ज्ञान विकास संस्थेच्या ॲड. पी.सी. पाटील विधी महाविद्यालयामध्ये ॲड. श्री. राम आपटे सर ( उच्च न्यायालय मुंबईचे वरीष्ठ अधिव्याख्याता) यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. ॲड. श्री. राम आपटे सरांनी कामगार कायदा :अंतदृष्टी व दृष्टिकोन: या विषयावर व्याख्यान केले. या व्याख्यानाचे आयोजन ॲड. पी.सी.पाटील विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सौ. शितला

गावंड मॅडम यांनी केले होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून तसेच दीपप्रज्वलन करून झाली. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सौ. शितला गावंड मॅडम यांनी ज्ञान विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲड. पी. सी. पाटील सरांचे आभार मानले. तसेच ॲड. श्री. राम आपटे सरांचे सुद्धा आभार मानले यावेळी ॲड. पी. सी. पाटील सरांनी विद्यार्थांना मार्गदर्शन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या, तसेच ॲड. श्री. राम आपटे सरांनी त्यांचे अनुभव कथन करताना उपस्थितांना अनेक बाबींवर विश्लेषणात्मक मार्गदर्शन केले. तसेच कामगार कायद्याचा दृष्टिकोन पटवून दिला व कामगार कायद्यावर विस्तृत स्वरुपात

व्याख्यान दिले. तद्नंतर उपस्थित विद्यार्थ्यांनी ॲड. श्री राम आपटे सरांना कामगार कायद्याविषयी प्रश्न विचारले सरांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांना पटवून सांगितली. प्रथम वर्षीय एल. एल. बी. विद्यार्थिनी शिवानी हिने सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. आणि प्रथम वर्षीय एल.एल.बी विद्यार्थी आकाश याने उपस्थित मान्यवरांचे तसेच विद्यार्थ्यांचे आभार मानले. त्यानंतर सर्वांनी राष्ट्रगान वंदे मातरम् गायले व कार्यक्रमाची सांगता झाली.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]