मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी चालू असलेल्या साखळी उपोषणाला माय बळीराजा संघटनेचा जाहीर पाठींबा
प्रतिनिधी, नवी मुंबई.
नवी मुंबई :- मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मराठा समाजाचे शिवश्री श्री मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभरात साखळी उपोषण सुरू केले आहे नवी मुंबईत कोपखैराणे येथे होणाऱ्या साखळी उपोषणाला माय बळीराजा सुरक्षा रक्षक वाहन चालक आणि जनरल वर्कर्स युनियन( महाराष्ट्र राज्य) यांच्याकडून जाहीर 
पाठींबा देण्यात आला यावेळी उपस्थित श्री अविनाश जालिंदर कदम संपर्क प्रमुख (महाराष्ट्र राज्य), श्री. दिलीप तुकाराम माने उपाध्यक्ष (महाराष्ट्र राज्य), दिपक लक्ष्मण सणस उपाध्यक्ष (नवी मुंबई) तसेच संघटनेचे इतर सदस्य यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी जाहीर घोषणा देत साखळी उपोषणास जाहीर पाठींबा दिला व उपोषणकर्त्यांची विचारपूस केली.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













