नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राला पुन्हा समस्यांचा घेराव
प्रतिनिधि कर्जत
महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना रायगड जिल्हा सचिव आकांक्षा शर्मा-सावंत व नेरळ शहर अध्यक्षा तेजश्री भोईर यांनी नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राला दिली धडक.
रायगड (कर्जत) :- कर्जत उपजिल्हा रुग्णालय प्रमाणे नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रातही अनेक सोयी-सुविधांचा अभाव आहे याकडे प्रशासन ,आरोग्य विभाग दुर्लक्ष करीत असल्याने रुग्णांप्रमाणे आरोग्य केंद्र ही सलाइनवर आहे.त्यामुळे त्याकडे त्वरित लक्ष देवून रुग्णांना चांगल्या प्रकारे उपचार मिळावेत यासाठी एप्रिल २०२३ ला

महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या कर्जत तालुका अध्यक्षा आकांक्षा शर्मा-सावंत व नेरळ शहर अध्यक्षा तेजश्री भोईर यांनी निवेदन देत आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर तात्काळ तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सि.के.मोरे यांनी आकांक्षा शर्मा-सावंत यांना आश्वासन दिले कि येत्या ११ एप्रिल पर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होतील आणि त्या पूर्णही झाल्या.परंतू मागील काहि दिवसांपासून पुन्हा नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील समस्यांबाबत नागरिकांकडून तक्रारी प्राप्त होत होत्या.सदर घटनेची माहीती मिळताच नेरळ शहर अध्यक्षा तेजश्री भोईर यांनी त्यांच्या रायगड जिल्हा सचिव आकांक्षा शर्मा-सावंत यांच्या कानावर घातल्या.त्यानंतर आकांक्षा शर्मा-सावंत यांनी तालुका आरोग्य अधिकारी श्री.एस.पावरा यांच्याशी व रायगड जिल्हा औषध पुरवठा विभागातील अधिकारी श्री.सुर्यकांत चौधरी यांच्याशी फोनवर संपर्क साधत सदर प्रकरणाबाबत जाब विचारला व प्राथमिक आरोग्य केंद्रात पि.सी.वी.चे इंजेक्शन उपलब्ध नाहीत रुग्णांना सदर इंजेक्शन बाहेरुन आणण्यास सांगितल जातय.वेळेवर डॉक्टर उपलब्ध नसतात,नर्स वाढवण्यात याव्यात,औषधांचा अपुर्ण साठा,शौचालयांची अस्वच्छता,भूलतज्ज्ञ डाॅक्टर नाही.त्याचप्रमाणे इंजेक्शन उपलब्ध नसतात,रुग्णवाहिका वेळेवर येत नाहीत.अश्या एक ना अनेक समस्या आहेत.त्याचबरोबर रुग्णांना वेळ प्रसंगी अन्य रुग्णालयात हलविण्याचे सल्ले दिले जातात.मात्र खाजगी हाॅस्पिटलप्रमाणे शासकीय रुग्णालयात सोय का केली जात नाही.असे अनेक प्रश्न तालुका आरोग्य अधिकारी यांना मनसे महिला सेना रायगड जिल्हा सचिव आकांक्षा शर्मा-सावंत यांनी विचारले,व खडसावून सांगितल कि जर आपण सामान्य नागरिकांना त्रास द्याल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या पद्धतीत तीव्र असे आंदोलन छेडेल आणि सदर आंदोलनास आपण व आपले आरोग्य विभाग जबाबदार असेल.सदर चर्चासत्रात जिल्हा आरोग्य अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांनी ग्वाही दिली की आमच्याकडे तुटवडा आहे परंतू आम्ही येत्या दोन दिवसांत पि.सी.वी. चे इंजेक्शन उपलब्ध करुन नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात व त्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या उपकेंद्रात पोहचवू व उर्वरीत समस्यां लवकरात लवकर मार्गी लावू असे आश्वासन दिले.फोनवरील झालेल्या संभाषणा नंतर लगेच काल दिनांक १८ ऑक्टोबर २०२३ रोजी ३०० डोस उपलब्ध करून देण्यात आलेत.त्यासाठी नेरळ येथील नागरिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेचे आभार मानले.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













