नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , हरी हरेश्र्वर आगर येथील मयेकर यांच्या बागेतील काळेश्रीदेवी मंदिर – आजचा महाराष्ट्र

हरी हरेश्र्वर आगर येथील मयेकर यांच्या बागेतील काळेश्रीदेवी मंदिर

श्रीवर्धन प्रतिनिधी रामचंद्र घोडमोडे 

रायगड (श्रीवर्धन) :- हरिहरेश्वर आगार येथील मयेकर वाडीमध्ये आतिशय प्राचीन मंदीर असुन सुमारे २०० वर्षांपूर्वी पासुन स्वयंभू स्थापित देवीच्या स्वरूपात जागृत देवी आहे. हे मंदिर नारळी सुपारीच्या बागेत वसलेले आहे. देवी नवसाला सर्वांना पावत असल्याचे भक्तगण सांगत असतात. तसेच भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करते त्यामुळे दर्शनास येणाऱ्या भक्तांची संख्या

खूपच वाढलेली आहे. मंदिरामध्ये दररोज दोन वेळा आरती तसेच नित्य पूजा केली जाते. नवरात्रीमध्ये रोज जागर भजन होम हवन ह्या विधी नित्याने मंदिराचे पुजारी जयंत कानडे हे करत असतात देवीच्या पूजे बरोबरच मंदिराचे पुजारी गेली अठरा वर्ष कासव संवर्धनाचे काम सुद्धा समुद्र किनारी करत आहेत ह्या त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना विविध पुरस्काराने गौरवण्यात आलेले आहे.अतिशय प्रेमाने कासवाची अंडी सांभाळून पुन्हा त्याचे प्रजनन होई पर्यंत समुद्राच्या किनारी वाळू मध्ये सांभाळून पिल्ले झाल्या नंतर त्याचे रेकॉर्ड जतन करण्याचे उत्तम कार्य जयंत कानडे करत आहेत. सर्व करण्या करिता बागेतील कळेश्री माता त्यांना उत्तम आरोग्य शक्ती आणि बळ देत असल्याचे तसेच नवरात्री निमित्ताने दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना मंदिराच्या वतीने शुभेच्छा देत आहेत.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]