नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , राष्ट्रीय महामार्गावर क्रमांक N H 52 या महामार्गावरील अवजड वाहतूक वळविण्यासाठी परवानगी मिळणे बाबत – आजचा महाराष्ट्र

राष्ट्रीय महामार्गावर क्रमांक N H 52 या महामार्गावरील अवजड वाहतूक वळविण्यासाठी परवानगी मिळणे बाबत

प्रतिनीधी श्रीकृष्ण शेळके

जालना :- उपरोक्त विषयाव्नये श्री मनोज जरांगे पाटील राहणार अंकुश नगर महाकाळा तालुका अंबड जिल्हा जालना व इतर यांनी दिनांक १४ /१० /२०२३ रोजी मराठा समाजातील लोकांसोबत संबोधन सभेचे आयोजन केलेले आहे सदर मराठा समाजातील संबोधन सभेमध्ये मराठवाडा विदर्भ खानदेश पश्चिम महाराष्ट्र विभागातून सभेसाठी अनेक लोक येण्याची शक्यता असून सदर सभा ही मौजे अंतरवाली सराटी येथील राम गव्हाण रोडवरील १०० एकर जागेवर धुळे ते सोलापूर राष्ट्रीय महामार्गा जवळ होणार असून सभेसाठी अनेक वाहने येण्याची शक्यता आहे सदर सभांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी होणार असून वाहनाच्या रहदारीमुळे अपघात होऊ शकतो त्यासाठी जनतेच्या सुरक्षिततेसाठी सदर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीस पर्यायी मार्गाने वळविणे आवश्यक आहे तरी छत्रपती संभाजी नगर ते बीड राष्ट्रीय महामार्गावरील येणारी व जाणारी वाहनातून व्यवस्था दिनांक १४/१०/२०२३ रोजीचे ०८ .०० ते २०. ०० वाजेपर्यंत अथवा (सभा संपून समुदाय जाई पर्यंत) खालील सर्व प्रकारच्या वाहतुकीस नमूद मार्गाने वळविणे आवश्यक आहे      

अ.क. सध्याचा प्रचलित मार्ग

1) जालना -अंबड- वडीगोद्री- शहागड मार्गे बीड कडे जाणारी वाहतूक

2) छत्रपती संभाजीनगर पाचोड – वडीगोद्री – शहागड मार्गे बीड ला जाणारी वाहतूक

3) बीड- शहागड – वडीगोद्री मार्गे जालन्या कडे जाणारी वाहतूक

4) बीड -शहागड -वडीगोद्री पाचोड मार्गे छत्रपती संभाजीनगर जाणारी वाहतूक

पर्यायी मार्ग 

जालना -अंबड -घनसावंगी आष्टी -माजलगाव बीड मार्गे जाईल 

छत्रपती संभाजी नगर -पैठण उमापूर फाटा मार्गे बीड कडे जाईल

बीड -माजलगाव -आष्टी- घनसावंगी अंबड मार्गे जालना जाईल

बीड- उस्मानपुर -फाटा पैठण मार्गे छत्रपती संभाजीनगर कडे जाईल

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]