आनंदाच्या शिध्याच्या बदल्यात जयभीम वाली बायको मागणार्या पुरवठा अधिकारी पप्पुलवाड याला निलंबीत करा बोरशे गुरुजी

जालना :- जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात तहसील कार्यालयासमोर दीपक बाबुराव जाधव राहणार पळसखेडा पिंपळे तालुका भोकरदन जिल्हा जालना यांचे ४ ऑक्टोबर २०२३ पासून आमरण उपोषण चालू आहे. त्यांची अद्याप प्रशासनाने चौकशी केली नाही. दखल घेतली नाही. या बाबत आम आदमी पार्टीने उपोषण कर्त्यास पाठिंबा दिला. असुन चौकशी करुन संबंधित पुरवठा अधिकारी भोकरदन यास तात्काळ निलंबीत करण्याची मागणी आम आदमी पार्टिने केली आहे.

याबाबत मा.जिल्हाधिकारी जिल्हा जालना तहसिलदार भोकरदन जि. जालना यांच्या मार्फत निवेदन देण्यात आलेले आहे.सविस्तर असे की,भोकरदन तहसील कार्यालयासमोर दीपक बाबुराव जाधव राहणार पळसखेडा पिंपळे तालुका भोकरदन जिल्हा जालना यांचे ४ ऑक्टोबर २०२३ पासून आमरण उपोषण चालू आहे. त्यांची अद्याप प्रशासनाने चौकशी केली नाही आणि आमरण उपोषणकर्त्याची दखल घेतलेली नाही आनंदाचा शिधा राशन दुकानदार देत नसल्यामुळे उपोषण कर्त्याने पप्पूलवाड तालुका पुरवठा अधिकारी यांना फोन लावुन तक्रार केली असता पप्पुलवाड यांनी उध्दट भाषा वापरुन राशन कीट च्या आनंदाच्या शिद्याच्या बदल्या मध्ये बायको पाठव असे म्हणुन उपोषण कर्त्यास धमकावले व बायको जय भीम वाली पाठव अशी मागणी केल्याचे उपोषण कर्त्याचे म्हणणे आहे.त्यांच्या वर कार्यवाही व्हावी म्हणुन जाधव आमरण उपोषण करत आहेत.या प्रकरणाची सविस्तर चौकशी करून तात्काळ श्री पप्पुलवाड यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी करुन,गरीब जनतेला प्रशासन जर असा त्रास देत असेल तर आम आदमी पार्टीच्या वतीने आंदोलन उभारले जाईल असा इशारा देण्यात आलेला आहे.यावेळी बोरशे गुरुजी जालना जिल्हा उपाध्यक्ष , जनार्दन सोळंके पाटील तालुका अध्यक्ष महजादखान शहर अध्यक्ष .शहर सचीव नारायण सोन्नी . लिलाबाई टेकाळे. महिला आघाडी उपाध्यक्ष हाजीभाई आणि पार्टिचे कार्यकर्ते हजर होते. बोरशे गुरुजी जालना जिल्हा उपाध्यक्ष ,आम आदमी पार्टी.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













