कोपर्डा येथे खाजगीकरणाच्या निर्णयाचा विरोध विद्यार्थ्यांचा मोर्चा

जालना(भोकरदन):-जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील कोपर्डा येथे शासनाने जिल्हा परिषदेच्या शाळांसंदर्भात घेतलेल्या खाजगीकरणाच्या निर्णयाच्या विरोधात सर्व विद्यार्थ्यांनी कोपर्डा येथे ग्रामपंचायत वर मोर्चा काढून आपल्या शाळेचे खाजगीकरण होवू नये म्हणून आपल्या स्तरावर कार्यवाही करून तसा
ठराव ग्रामपंचायत च्या वतीने शासनाला द्यावा आणि शाळेचे खाजगीकरण थांबवावे, अशी मागणी केली यावेळी यावेळी गावकरी व शाळेतील विद्यार्थ्यांनी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करून शासनाच्या खाजगीकरणाच्या निर्णयाचा विरोध केला शाळेतील विद्यार्थ्यी आणि 
संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष कृष्णा पाटिल पाबळे, माजी सरपंच रावसाहेब दाभाडे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र पाबळे, शालेय व्यवस्थापन उपाध्यक्ष गजानन पाबळे तसेच रघुनाथ पाबळे व इतर गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते…
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













