नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , वरसे ग्रामपंचायतच्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी होईल का ? – आजचा महाराष्ट्र

वरसे ग्रामपंचायतच्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी होईल का ?

प्रतिनीधी समीर बामुगडे

रायगड (रोहा) :- शासनाच्या जनतेसाठी असलेल्या कुठत्याही योजना या चांगल्याच असतात म्हणूनच म्हटले जाते की जनतेच्या कल्याणासाठी शासकीय योजना प्रत्यक्षात राबवून त्याचा फायदा व लाभ गरजू आणि पात्र लाभार्थीना मिळवून देण्याची जबाबदारी संबंधित शासकीय अधिकाऱ्यांची असते शासकीय योजनांचा लाभार्थींना लाभ मिळवून देणे ही अधिकाऱ्यांची जबाबदारी असते,मात्र पैसे खाण्यात चढाओढ करणारे अधिकारी आपल्या ठेवल्या दलाल मार्फत झारीतील शुक्राचार्य कोण याना कधी धडा शिकविणार ? हा गहन प्रश्न सध्या रोहा तालुक्यातील वरसे

ग्रामपंचायतीच्या जनतेतून उपस्थित केला जात आहे,वरसे ग्रामपंचायत सचिव याची पुर्ण चौकशी करुन व त्यांची होणारी आंतर जिल्हा बद्दली रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी थांबवावी अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ता व तसेच सामाजिक कार्यकर्ता कडून जोर धरत आहे. वरसे ग्रामपंचायत ५०० रूपये रक्कमे पेक्षा जादा चेकने व्यवहार बंधनकारक असतान सुध्दा रोखीने व्यवहार केले गेले आहेत संरपच, ग्रामसेवक, व विस्तार अधिकारी यांची सखोल चौकशी केली तर दोषी आढळून येतील याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच ग्रामनिधी, पाणीपुरवठा निधी याची पण चौकशी करण्याची ग्रामस्थांकडून मागणी होत आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]