नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , मुरुड तालुक्यात अवैध खैराची तोड वनविभाग मुरुड यांनी आवळल्या खैर तस्करी करणा-यांच्या मुसक्या – आजचा महाराष्ट्र

मुरुड तालुक्यात अवैध खैराची तोड वनविभाग मुरुड यांनी आवळल्या खैर तस्करी करणा-यांच्या मुसक्या

प्रतिनीधी समीर बामुगडे

रायगड :- मुरुड तालुका हा पर्यटनक्षेत्र म्हणून ओळखला जातो नयनरम्य समुद्रकिनाराच्या पाण्यात जंजिरा किल्ला हि खास मुरुडची ओळख परंतू हीच ओळख पुसण्याचा चंग स्थानिक शासकीय अधिकारी व खैर तस्करी माफियानी बांधलाय की काय ?अशी स्थिती निर्माण झाली आहे,गोकुळ अष्टमीच्या पूर्वसंध्येला उपवनसंरक्षक रोहा श्री अप्पा निकत तसेच सहाय्यक वनसंरक्षक रोहा विश्वजीत जाधव यांच्या मार्गदर्शना खाली मुरुड वनक्षेत्रपाल श्रीमती प्रियंका पाटील यांनी रात्रीची गस्त करीत असताना मैजे

भालगाव येथे मुरुड रोहा रोडवर सकाळी ४.४५वाजता महिंद्रा बोलेरो पिकअप MH06/BW7813ची चौकशी कामी अडवळी असता तर खैराची लाकूडाची सोळीव नग ९९ घ.मी.१,५८९ किमत २०५४१/-महिद्रा बोलेरो पिकअप किमत ७,००००० असे एकूण ७२०५४१/-चा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदरचे आरोपी प्रदिप सुतार, तेजस धाडगे,नामदेव उतेकर, सर्व राहणार महाड तालुका याच्यावर भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम अन्वये २६६१)फ ,४१)२५)४२अन्वये कारवाई करण्यात आली

पुढील तपास परिमंडळ वन अधिकारी भालगाव दिनेश दिघे,विजय कोस्बे, संतोष रेवणे, आर जी गायकवाड, विलास वाघमारे, वनरक्षक सचिन मानकर, जानकर इंदे,खेडकर, त्रिभुवन, वनमजूर संकपाळ, रोटकर,वनविभाग तपास करीत आहे,या कारवाई वर निसर्ग प्रेमी सदिप घरत यांनी या कारवाईत संशय व्यक्त केला असून खाजगी शेतकऱ्यांकडून व्यापार यांनी विकत घेतली असून व तसेच बिट वनपाल याच्या संगनमत करून तोड केली असून या वनपालची व वनरक्षक याची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल का ?असा सवाल वनविभागाला सदिप घरत निसर्ग प्रेमी यांनी केला आहे,

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]