नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , शिक्षकी पेशाला काळिमा, ज्ञानाचे धडे देणाऱ्या शिक्षकाकडूनच हैवानी कृत्य – आजचा महाराष्ट्र

शिक्षकी पेशाला काळिमा, ज्ञानाचे धडे देणाऱ्या शिक्षकाकडूनच हैवानी कृत्य

प्रतिनीधी श्रीकृष्णा शेळके

विकृत शिक्षक पोलिसांच्या ताब्यात

भोकरदन : शिक्षक म्हटलं की भावी पिढी घडवणारा व्यक्ती असंच पाहिलं जातं. मात्र,भोकरदन तालुक्यातील एका विकृत शिक्षकाने शिक्षकी पेशाला काळिमा फासत चिमुकल्या विद्यार्थीनींवरच अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. शिक्षकाने आपल्याच विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेने विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीचं वातावरण असून बाबासाहेब जगदाळे असं आरोपी शिक्षकाचं नाव आहे.आरोपी बाबासाहेब जगदाळे हा जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक आहे.त्याने शाळेतील एका विद्यार्थीनींचा बाल लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे.या प्रकरणी पोलिसांनी आरोपी शिक्षकाला ताब्यात घेतलं आहे.हा घृणास्पद प्रकार सुरु होता.व विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांना ही बाब समजताच त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली.भोकरदन पोलीस स्टेशनने तक्रारीनंतर नराधम शिक्षकावर या प्रकरणात आज दि.७ सप्टेंबर रोजी कलम ३५४ (अ, ब), पॉक्सो कलम ८ व १० अंतर्गत पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]