नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , प्राथमिक शिक्षक समिती खेडच्या वतीने एक दिवसीय किरकोळ रजा आंदोलन संपन्न.. – आजचा महाराष्ट्र

प्राथमिक शिक्षक समिती खेडच्या वतीने एक दिवसीय किरकोळ रजा आंदोलन संपन्न..

पत्रकार राजेंद्र दळवी

रत्नागिरी (खेड) :- महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती या संघटनेच्या वतीने शिक्षक दिनी विद्यार्थ्यांना शिकू द्या, आम्हाला शिकवू द्या असे राज्यव्यापी एकदिवसीय सामूहिक किरकोळ रजा आंदोलन राज्य शाखा व जिल्हा शाखेच्या निर्देशानुसार खेड येथे करण्यात आले.

      ऑनलाइन कामांसह अन्य अशैक्षणिक कामांमुळे वैतागलेल्या शिक्षकांच्या संतप्त भावना व्यक्त करण्यासाठी तसेच विद्यार्थी शिक्षकांच्या न्यायसंगत मागण्यांच्या सोडवणुकीकडे शासनाचे होणारे दुर्लक्ष या विरोधात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने शिक्षक दिनी सामूहिक किरकोळ रजा आंदोलनाची हाक दिली. या सामूहिक एक दिवशीय किरकोळ रजा आंदोलनाला राज्यातील अन्य काही संघटनेच्या सन्माननीय पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला. आंदोलनात सहभाग घेतला. शिक्षक समितीच्या शिलेदारांनी या आंदोलनाविषयी होणाऱ्या अपप्रचाराकडे दुर्लक्ष करून कोणत्याही चुकीच्या अफवेला बळी न पडता निर्भीडपणे आंदोलन यशस्वी केले. विद्यार्थ्यांना शिकू द्या- शिक्षकांना शिकवू द्या. ही भूमिका घेऊन गोरगरीब कुटुंबातील बालकांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आपली प्रतिबद्धता व्यक्त केली. गुणवत्ता पूर्ण शिक्षणातील सर्व अडथळे दूर करून बालकांना शिकवण्यासाठी आम्हाला वेळ द्या. ही लाख मोलाची उदात्त भावना ठेवून अनेक राज्यातील हजारो शिक्षक या आंदोलनात सहभागी झाले.

 

   हे राज्यव्यापी आंदोलन खेड तालुक्यात देखील शिक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाले. खेड तालुक्याच्यावतीने मान. प्रांताधिकारी व मान.तहसीलदार खेड यांचे मार्फत मान.मुख्यमंत्री महोदय, मान.उपमुख्यमंत्री महोदय, मान. शिक्षणमंत्री महोदय व अन्य संबंधित अधिकारी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

        यावेळी प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा सरचिटणीस श्री.सुनील दळवी,खेड तालुकाध्यक्ष श्री.शरद भोसले, सहसचिव श्री.धर्मापाल तांबे,शिक्षक पतपेढी तज्ञ संचालक श्री. संजय सुर्वे, उपाध्यक्ष श्री. बबन साळवी, संघटना प्रवक्ते श्री.नेत्रदीप तांबे, ज्येष्ठ पदाधिकारी श्री.अनंत विचारे, श्री.कृष्णा पवार, श्री.श्रीकृष्ण खांडेकर, श्री. अनिल मोरे, श्री.अमर चव्हाण, श्री.अनंत मोरे, श्री अमोल जाधव, श्री.गजानन पालांडे, श्री.नितेश कांबळे, श्री.दीपक कांबळे, श्री.दिलीप कडू, श्री.विष्णू वाघ ,श्री.नवनीत घडशी, श्री. संतोष बर्वे, श्री.अनिल भंडारी, श्री.उदय रेडीज, श्री. मनोहर पेंडखलकर, श्री.अनिल भंडारी, श्री. विनोद लष्कर, श्री.भास्कर सालप, श्री.संतोष चव्हाण, श्री.संतोष मोरे, यांचेसह महिला प्रतिनिधी सौ.पुनम दळवी, सौ.दिक्षिता तांबे, श्रीम.लीना हरमळकर, श्रीम.स्नेहल यादव, सौ शर्वरी भोसले, श्रीम. कल्याणी कासार, सौ.नेहा देवरुखकर यांचे सह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

      आंदोलनाला प्रत्यक्ष उपस्थित राहून व किरकोळ रजा घेऊन उस्फुर्त प्रतिसाद देत शिस्तबध्द पध्दतीने यशस्वी केल्याबद्दल सर्वांचे तालुका शाखेच्या वतीने आभर मानून आंदोलनाची सांगत करण्यात आली.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]