नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , सैतानाची वाडी येथे कोलाड विभाग काँग्रेस कमिटी तर्फे स्वच्छता अभियान – आजचा महाराष्ट्र

सैतानाची वाडी येथे कोलाड विभाग काँग्रेस कमिटी तर्फे स्वच्छता अभियान

कोलाड प्रतिनिधि 

रायगड (रोहा – कोलाड) :- चिंचवली सैतानाची वाडी येथे कोलाड विभाग काँग्रेस कमेटी तर्फे व विभाग अध्यक्ष हरिओम भाऊ टाळकुटे यांच्या संकल्पनेने स्वच्छता अभियान राबविण्यात आले .यावेळी किल्ला गांव कमिटी अध्यक्ष मंगेश जाधव, उपाध्यक्ष दिनेश जाधव ,सेक्रेटरी लक्ष्मण पवार तसेच खोंड्याची वाडी काँग्रेस कमिटी अध्यक्ष समिर पवार, सेक्रेटरी विनायक कोळी ,संदीप पवार ,संजय जाधव,विशाल जाधव, सैतानाची वाडी काँग्रेस कमिटी अध्यक्ष दत्ताराम पवार, उपाध्यक्ष रघुनाथ वाघमारे तसेच सैतानाची वाडीतील ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी हरिओम भाऊ टाळकुटे यांनी स्वच्छता अभियानात सामिल झाल्याबद्दल ग्रामस्थांचे आभार मानले .सदर कार्यक्रम झाल्यानंतर गावातील विविध प्रश्नांबाबतची चर्चा सैतानाची वाडी अध्यक्ष दत्ताराम पवार यांनी कोलाड विभाग काँग्रेस कमिटी अध्यक्ष हरिओमभाऊ टाळकुटे यांच्याशी केली . हरिओमभाऊ टाळकुटे यांनी या समस्या काँग्रेस पक्षाच्या माध्यमातुन निश्चित सोडवणार असल्याचे सांगितले . महाराष्ट्र ही संतांची भुमी असुन संत गाडगे बाबांसारखे महान संत आपल्या महाराष्ट्रात होऊन गेले. त्यांच्या प्रेरणेने आपण ही स्वच्छता मोहिम राबवली असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच ही मोहिम राबवत असताना आपण सामाजिक जाणिवेतुन काम करत असल्यामुळे व आपला पक्ष जरी राजकीय असला तरी आपण ९० टक्के समाजकारण व १० टक्के राजकारण करणार असल्याचे सांगितले .आणि म्हणुनच आज आपण पक्षाचा बॅनर वा झेंडा वापरला नसल्याचे सांगितले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]