नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , रायगड जिल्हा परिषद शाळा कासारभाट येथील मराठी शाळेला मिळाली संगणकाची भेट.. – आजचा महाराष्ट्र

रायगड जिल्हा परिषद शाळा कासारभाट येथील मराठी शाळेला मिळाली संगणकाची भेट..

प्रतिनीधी सुरेश तांडेल

रायगड (खारपाडा) :- रायगड जिल्यातील पनवेल तालुक्या मधील कासारभट गावातील रा.जी.प शाळा असून या शाळेत पहिली ते चौथी पर्यंत वर्ग भरवले जातात. शिवाय ही शाळा सेमी इंग्लिश शाळा आहे . ही शाळा इंग्रजी शाळे इतकीच महत्वाची आहे. जे इंग्लिश शाळेत शिकवले जाते तेच शिक्षण या शाळे मध्ये शिकवले जाते. परंतु या शाळेत संगणकाच शिक्षण मिळत नव्हते ते संगणकी शिक्षण मिळण्या करिता या शाळेचा माझी विध्यार्थी गुरुनाथ भोंडकर यांच्या पुढाकाराने शाळेला संगणक भेट स्वरूपात दिले. 

 सध्याच युग हे संगणकाचे आहे . संगणकाचे ज्ञान हे प्रत्यक् शालेय विद्यार्थला असणे गरजेचे आहे. जगाच्या पाठीवर कुठे ही जा तिथे तुम्हला संगणक दिसेल. उदा. दुकान, ऑफिस , घर, शाळा, कंपनी इ. संगणका मुळे अनेक कामे लवकर होतात.शिवाय सर्व माहिती ही संगणका मुळे मिळते.संगणका मुळे जग जवळ येते. संगणका चे ज्ञान हे या शाळेतील गरीब ,होतकरू विद्यार्थना मिळावे याची जाणीव ही गुरुनाथ भोंडकर ला होती .या त्यांच्या प्रयत्ना मुळे शाळेतील विद्यार्थीना डिजिटल शिक्षण घेता येईल हे संगणक रा. जी. प. शाळेला शाळेचे माजी विद्यार्थी गुरुनाथ् भोंडकर, डॉ. पूजा भोंडकर आणि हेमंत पाटील यांच्याकडून शाळेसाठी संगणक भेट देण्यात आला. या संगणकाच्या उदघाट्न प्रसंगी गुरुनाथ भोंडकर यांनी शाळेतील मुलांना संगणकाची माहिती दिली डॉ. पूजा यांनी मुलांना व त्यांच्या पालकांना दातांच्या स्वच्छते बाबत जनजागृती केली. तसेच झावरे साहेब, श्रीमती झावरे मॅडम यांनी संगणक या विषयी मार्गदर्शन केले.

 

  तसेच या संगणकाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ग्राहक मंच कायदेतज्ञ झावरे साहेब ,शाळा व्यवस्थापण समितीचे अध्यक्ष भालचंद्र भोंडकर . दिपाली (ताई) पाटील, संभाजी पाटील, मनस्वी मोकल ,पूजा म्हात्रे, अनिता पाटील, कैलास पाटील, अनिता ठाकूर,निशा ठाकूर, पूजा म्हात्रे आदी उपस्थित होते आलेल्या सर्व पाहुण्यांचे मुख्याध्यापक श्री धस सर यांनी आभार मानले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]