श्रीवर्धन उपविभागीय कार्यालयामध्ये कायमस्वरूपी उप विभागीय अधिकारी उपस्थित होत नसल्याने सुनावण्या रखडल्या.
प्रतिनीधी रामचंद्र घोडमोडे
रायगड (श्रीवर्धन) :- श्रीवर्धन उपविभागीय अधिकारी अमित शेडगे यांची बदली झाल्या नंतर कार्यालयाची जबाबदारी प्रभारी म्हणून माणगाव उपविभागीय अधिकारी संदिपान सानप यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. त्यांच्या कडून ऑनलाइन दाखल्यांचा कारभार व्यवस्थित होत असल्याची माहिती सेतू कार्यालया मधून मिळाली. मात्र प्रशासकीय इतर कामे तसेच प्रलंबित असलेल्या सुनावण्या होत नसल्याने नागरिकां मध्ये प्रचंड नाराजी
आहे.सुनावणी धारकांना पाच ते सहा वेळा पुढील तारखा देऊन समजूत काढण्यात येत असून सुनावणीचा निर्णय उपविभागीय अधिकारी यांच्या हातात असल्याने भीतीपोटी कोणीही बोलण्यास तयार होत नाही. यामुळे सुनावणी साठी येणाऱ्या नागरिकांना आर्थिक तसेच मानसिक त्रास सुद्धा होत असून लवकरात लवकर कायम स्वरूपी अधिकारी नेमण्याची मागणी होत आहे. कार्यालयीन वेळेत उपस्थित नसणाऱ्या प्रभारी उपविभागीय अधिकारी यांची मंत्री महोदयांच्या दौऱ्या दरम्यान आवर्जून उपस्थित असते.कार्यालया मध्ये चौकशी केली असता प्रभारी उप विभागीय संदिपान सानप यांनी पदभार स्वीकारल्या नंतर फक्त सहा ते सात वेळा श्रीवर्धन कार्यालयामध्ये उपस्थित राहिल्याची माहिती मिळाली. मुंबई पुणे तसेच तालुक्यातील इतर ठिकाणा वरून कामा निमित्ताने येणाऱ्या नागरिकांना अधिकारी कार्यालयात उपस्थित होत नसल्याने खूप मोठा त्रास सहन करावा लागत असून कायमस्वरूपी अधिकारी नेमण्याची मागणी होत आहे.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













