अशफाक पानसरे यांची रायगड जिल्हा काँग्रेस औद्योगिक (इंडस्ट्रियल) सेलच्या उपाध्यक्षपदी निवड

रायगड (रोहा) :- नागोठणे शहर काँग्रेस अध्यक्ष अशफाक पानसरे यांची अनेक वर्षा पासून काँग्रेस पक्षावर असलेली निष्ठा पाहुन पक्षा तर्फे प्रत्येक ठिकाणी असलेले आंदोलन,सभा, पक्षाची भारत जोडो यात्रा कार्यक्रमातील सहभाग तसेच नुकतेच मुबंई दादर येथे काँग्रेस(आय) पक्षाच्या नेत्या श्रीमती मा.सोनियाजी गांधी व खा. मा. श्री.राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली टिळक भवन या ठिकाणी काँग्रेस पक्षाची बैठक घेण्यात आली होती त्या देखील बैठकीच्या वेळी नागोठणे शहर अध्यक्ष श्री. अशफाक पानसारे यांची उपस्थिती व पक्ष वाढीसाठी असलेली ओढ पाहुन काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष मा. श्री. नाना पटोले साहेब यांच्या आदेशानुसार शहर अध्यक्ष श्री.अशफाक पानसरे यांची महाराष्ट्र राज्य औद्योगिक सेल च्या रायगड जिल्हा उपाअध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.

रायगड जिल्हा उपाध्यक्ष पदाचे नियुक्ती पत्र मुबंई दादर टिळक भवन येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस औद्योगिक सेल चे अध्यक्ष मा.श्री. डॉ. हेमंत सोनारे साहेब यांच्या हस्ते देण्यात आले त्यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस औद्योगिक सेलचे सचिव आनंद कुलकर्णी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस इंडस्ट्रियल सेलच्या सहसचिव सौ. कुलकर्णी मॅडम, सहसचिव राजेंद्र म्हात्रे,रायगड जिल्हा काँग्रेस औद्योगिक सेलचे अध्यक्ष श्री.अशोक मोकल, रोहा पंचायत समितीचे माजी सदस्य श्री. बिलाल कुरेशी, रोहा तालुका अल्पसंख्याक समाज अध्यक्ष श्री. याकूब सय्यद तसेच मोठ्या संख्येने काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.नागोठणे शहर काँग्रेस अध्यक्ष श्री. अशफाक पानसरे यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस औद्योगिक (इंडस्ट्रियल)सेल रायगड जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड झाल्याची बातमी सर्वत्र पसरताच त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













