नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , मराठा आरक्षणकर्त्याच्या लाठी चार्ज हल्ला प्रकरणी भोकरदन बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद – आजचा महाराष्ट्र

मराठा आरक्षणकर्त्याच्या लाठी चार्ज हल्ला प्रकरणी भोकरदन बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रतिनीधी श्रीकृष्णा शेळके

आंदोलन कर्त्यांनी रस्त्यावर टायर जाळून तर एकाने स्वतःची दुचाकी जाळून केला निषेध

जालना (भोकरदन) :- भोकरदन तालुक्यात जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बसलेल्या आंदोलनकर्त्यावर झालेल्या लाठी चार्जच्या निषेधार्थ भोकरदन मध्ये सकल मराठा समाज बांधवांकडून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी (दि.३) रविवार रोजी बंद ची हाक देऊन आंदोलन

करण्यात आले.या दरम्यान व्यापाऱ्यांनी सुध्दा आप आपली दुकाने सकाळपासूनच बंद ठेऊन आंदोलनाला पाठिंबा दिला.तसेच सकल मराठा समाजाचे आंदोलनकर्ते आंदोलनाला शहरासह परिसरातील समाज बांधव सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठया संख्येने सहभागी झाले होते.त्यांनी त्या निषेधार्थ घोषणा देत मराठा आरक्षण आमच्या हक्काचा नाही कोणाच्या बापाचा घोषणा देऊन सरकारचा निषेध व्यक्त केला.यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.गणपत दराडे,सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी वैद्यसह सहा अधिकारी व ४५ पोलीस कर्मचाऱ्यांसह मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]