नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , मनसे तर्फे कर्जत रेल्वे स्थानकात दिशा नामदर्शक फलक तसेच अन्य प्रवाशांच्या समस्या संबंधित निवेदन कर्जत स्टेशन प्रबंधक यांना देण्यात आले – आजचा महाराष्ट्र

मनसे तर्फे कर्जत रेल्वे स्थानकात दिशा नामदर्शक फलक तसेच अन्य प्रवाशांच्या समस्या संबंधित निवेदन कर्जत स्टेशन प्रबंधक यांना देण्यात आले

कर्जत प्रतिनिधि 

रायगड (कर्जत) :- मनसे रायगड जिल्हा अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष म.न.रे.का.से.,सन्माननीय श्री.जितेंद्र पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत शहर उपाध्यक्ष श्री.राजेश साळुंखे,मा.कर्जत शहर उपाध्यक्ष श्री.रांकित शर्मा, मा.कर्जत शहर अध्यक्ष,म.न.वि.से. कु.मयुरेश जोशी.महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेना मुंबई विभाग सह. सचिव श्री.मंगेश मोहन दळवी, कर्जत युनिट सचिव श्री.विश्वनाथ लदगे व कर्जत युनिट पदाधिकारी

समवेत आज कर्जत स्थानकात दिशा नामदर्शक फलक तसेच अन्य प्रवाशांच्या समस्या संबंधित निवेदन कर्जत स्टेशन प्रबंधक यांना देण्यात आले. बऱ्याच वर्षांपासून कर्जत स्थानकात दिशा दर्शक फलक नसल्याने प्रवाशांची त्यांच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी स्थानकातून बाहेर कुठल्या दिशेला रस्ते वाहतूक भेटेल याची गैरसोय होत आहे. हा विषय कर्जत शहर पदाधिकारी यांच्या कडे आला असता यावर तातडीने उपाययोजना करण्यात यावी व दिशा दर्शक फलक तातडीने स्थानकात लावण्यात यावे यासाठी स्टेशन प्रबंधक यांना निवेदन देण्यात आले. स्थानक प्रबंधक यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच फलक लावण्यात येतील असे आश्वासन दिले आहे.सर्व सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सदैव तत्पर महाराष्ट्र नवनिर्माण सेना

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]