नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , आरोग्य स्वयंसेविका समाजासाठी करीत असलेल्या सहाय्याप्रती शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे व युवासेना अंतर्गत कृतज्ञता समारोहाचे आयोजन – आजचा महाराष्ट्र

आरोग्य स्वयंसेविका समाजासाठी करीत असलेल्या सहाय्याप्रती शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे व युवासेना अंतर्गत कृतज्ञता समारोहाचे आयोजन

मुंबई प्रतिनिधि/ महेश कदम

मुंबई :- शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री. उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे व युवासेना शाखा क्र . २०१ अंतर्गत युवासेना सहसचिव श्री. मयुर कांबळे यांच्या मार्फत वडाळा विधानसभेतील आर. ए. किडवाई रोड, किडवाई नगर येथील बृहन्मुंबई महानगरपालिका दवाखाना येथे कार्यरत असणाऱ्या आरोग्य स्वयंसेविका यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणेकरीता आयोजीत करण्यात आलेला ‘बॅग व छत्रीचे वाटप’ हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.

मुंबई शहरातील तळागाळापासून उच्चभ्रू वस्तीपर्यंत आरोग्याच्या मूलभूत सुविधा पोहचविण्याचे काम हे आरोग्य स्वयंसेविका करीत असतात. कोरोना काळात केवळ या आरोग्य स्वयंसेविकांमुळे संक्रमणावर नियंत्रण मिळविणे शक्य झाले होते.

या कार्यक्रम प्रसंगी विभाग संघटिका, माजी महापौर सौ. श्रद्धाताई जाधव, विभाग संघटक श्री. राकेश देशमुख, माधुरीताई मांजरेकर, रवी घोले, विशाल जाधव, भाऊ करगुटकर, मोहम्मद हुसैन, दिपक पाटील, स्वप्नाली ठाकूर, स्मिता वाडेकर, सुनिता बळी, प्रमिला गुरखे, श्रध्दा तांबे, सुरेखा साळवी त्यांच्यासह निष्ठावंत शिवसैनिक उपस्थित होते .

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]