खारघर सिडको पाणीपुरवठा कार्यालयावर मोर्चाचा ठराव मंजूर सोमवार दिनांक ४ सकाळी १०:३० वाजता हंडा-मोर्चा निश्चित
नवी मुंबई /प्रतिनिधी
तळोजा कॉलनी फेडरेशनला, खारघर व कामोठे कॉलनी फोरमचा पाठिंबा
नवी मुंबई :- वारंवार आंदोलने व पाठपुरावा करून सुद्धा भर पावसाळ्यात देखील योग्य प्रमाणात तळोजातील जनतेला पाणी न शकणाऱ्या सिडको विरुद्ध आता पाणीपुरवठा विभाग खारघर इथे संवाद दिनांक ४ सप्टेंबर सकाळी साडेदहा वाजता आंदोलन 
करण्याचे आजच्या तळोजा कॉलनी फेडरेशनच्या मीटिंगमध्ये निश्चित करण्यात आले असून सदर आंदोलनाला खारघर कॉलनी फोरम व कामोठे कॉलनी फोरम ने पाठिंबा दिला आहे.वारंवार सिडको पाणीपुरवठा अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून देखील पाणी भ्रष्टाचार,कंत्राटी कामगारांची गैरवर्तणूक,अधिकच्या पाण्याची मागणी या सर्व मागण्या पूर्ण न झाल्यामुळे सदर आंदोलनाचा ठराव 
मंजूर करण्यात आला.या आंदोलनाला आजच्या मीटिंगमध्ये तळोजा फेज एक आणि दोन येथील जवळपास १०० सोसायटी यांनी पाठिंबा दिला आहे.याशिवाय शहरातील महिला मोठ्या प्रमाणावर सदर आंदोलनास उपस्थित राहणार आहेत. प्रशासकीय आणि राजकीय इच्छाशक्तीचा अभाव यामुळे पाण्याची दुरावस्था, रस्त्याची दुरावस्था ,स्वच्छतेची दुरावस्था,सबवेचीी दुरावस्था,या सर्व गोष्टीमुळे तळोजा तील जनता त्रस्त झालेली आहे.त्यामुळे सोमवारी कामकाजाचा दिवस असून सुद्धा जनसामान्यांनी कामावरून सुट्टी घेऊन सदर आंदोलन यशस्वीपणे पार पाडण्यासाठी हातभार लावण्याचे वचन फेडरेशन कमिटीला दिले आहे.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













