सन्माननिय मा.नगरसेवक चंद्रकात शेठ रामदास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते
नवी मुंबई /प्रतिनिधी
नवी मुंबई :- श्री. चंद्रकांतशेठ रामदास पाटील यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त विभागात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये प्रामुख्याने रक्त दान शिबिरामध्ये २२६ रक्तदात्यांनी रक्तदान केले. विभागातील जेष्ठ नागरिकांचा सत्कार, 
इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा, कांदा-बटाटा मार्केट येथे लॅारी टेंपो असोसिएशन यांच्या वतीने मार्केटमधील कामगारांच्यासाठी स्नेहभोजन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. क्रिकेटप्रेमीसांठी भव्य ओपन पावसाळी क्रिकेट सामन्यांचे आयोजन केले होते. सायंकाळी निवासस्थानी विभागांतील
नागरिकांकडून केक कापून साजरा केला. तसेच डि. आर. पाटील रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष. श्री संतोष जाधव व बहुसंख्य रिक्षाचालक यांच्या उपस्थितीत सानपाडा स्टेशन येथे केक कापून वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच रक्तदान शिबिरात श्री संतोष जाधव यांच्या नेतृत्वाखाली अनेक रिक्षाचालक बांधव रक्तदान शिबिरात सहभागी झाले होते.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













