चिंचवली वाडी येथे आरोग्य तपासणी व आभा कार्ड काढण्यासाठी शिबिरा चे आयोजन
प्रतिनीधी माणगाव
रायगड (माणगाव) :- चिंचवली ग्रामपंचायतीच्या माध्यमातून उपकेंद्र देवळी अंतर्गत दि २२ ऑगस्ट रोजी आरोग्य तपासणी शिबीर त्यामध्ये रक्तदाब (बीपी), मधुमेह (शुगर) व इतर तपासण्या तसेच आभा कार्ड काढण्यासाठी मेळाव्याचे आयोजन चिंचवली वाडी येथील हनुमान मंदिर येथे करण्यात आले होते. यावेळी चिंचवली

वाडीच्या ग्रामस्थांनी सहभाग घेतला सकाळी १० वाजता शिबिराला सुरवात झाली यावेळी चिंचवली ग्रामपंचायत सरपंच नंदू पारावे, माजी सरपंच कृष्णा तटकरे, उप सरपंच किशोर तटकरे, ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष चंद्रकांत भोसले, ग्रा सदस्य विलास यादव, चंद्रकांत होळकर, सुधाकर जामदार, गोरेगाव उपकेंद्र देवळी चे डॉ ढाकणे,आरोग्य सेविका,अशा सेविका,अंगणवाडी सेविका इत्यादी उपस्थित होते
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













