नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , उद्धव गटात गेलेले शिंदे गटाचे कार्यकर्ते २४ तासात स्वगृही – आजचा महाराष्ट्र

उद्धव गटात गेलेले शिंदे गटाचे कार्यकर्ते २४ तासात स्वगृही

प्रतिनीधी संजय रिकामे

रायगड (तळा) :- तालुक्यामध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी सध्या नाट्यमय घडामोडी घडत असून दिनांक १९ ऑगस्ट रोजी तळा नगरपंचायत प्रभाग क्रमांक ४ मधील मुस्लिम युवक,महिला मंडळ ग्रामस्थ यांनी स्थानिक नेतृत्व नजीर पठाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत जिल्हा प्रमुख अनिल नवगणे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला होता यावेळी जिल्हा प्रमुख नवगणे यांनी प्रत्येकाला शिवसेनेची(उद्धव गट) शाल आणि पुष्पगुच्छ देऊन पक्षात त्यांचे स्वागत केले, परंतु २४ तास होण्या आधीच प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी पुन्हा शिवसेना तळा शहर प्रमुख राकेश वडके

यांच्या प्रमुख उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला आहे.या नाट्यमय घडामोडीनंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला चांगलीच चपराक बसली आहे.दिशा भुल करुन मुस्लिम ‌बांधवांचा प्रवेश घेण्यात आला होता आपली फसवणूक झाले असल्याचे समजताच यांच मुस्लिम बांधवांनी शिंदे गटात प्रवेश केला असल्याचे तळा तालुका शिंदे गटाचे अल्पसंख्याक प्रमुख दिलावर खाचे यांनी सांगितले या पक्ष प्रवेशासाठी तालुका प्रमुख प्रदुम्न ठसाळ,शहर प्रमुख राकेश वडके,रायगड जिल्हा कोअर कमिटी सदस्य लिलाधर खातु,तालुका सपंर्क प्रमुख ॲड.चेतन चव्हाण प्रभाग ४ चे नगरसेवक, सिराज खाचे, नगरसेवक नरेश सुर्वे,नगरसेवक,मंगेश पोळेकर माजी सरपंच नमित पांढरकामे,रमेश पिंपळे, सर्व पदाधिकारी,तमाम शिवसैनिक, सर्व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]